माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या काळात मीच निलेश लंकेंना राष्ट्रवादीत घेतले, निवडून आणले. पण माणसे एखाद्या पदावर गेले की बदलतात. तसेच निलेश लंकेंचे झाले, ते बदलले. आता खासदारकी त्यांच्याकडे,
आमदारकी सुद्धा ते त्यांच्याच घरात घ्यायला निघाले आहेत. त्यामुळे जर दोन्हीही एकाच घरामध्ये गेले तर तुम्हाला कोणीही वाली राहणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.एका सभेत अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत
असतानाच एका कार्यकर्त्याने खालून जोरदार घोषणाबाजी सुरु केली. दुष्काळी पारनेर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी सभेदरम्यान बॅनर फडकवत ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशी घोषणाबाजी केली. सभेत व्यक्ती आणल्याने संतापलेल्या अजित पवार
यांनीही ‘आम्ही कुठे म्हणतो आमच्या बापाचे? असा प्रतिसावाल करत सभेत व्यत्यय आणू नका, असे ठणकावून सांगितले.दरम्यान अजित पवार संतापले आणि त्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, थांब ना, मी तेच सांगतोय. तुझ्या जे मनात आहे ना तेच
माझ्या बोलण्यातून बाहेर पडणार आहे. थांब जरा. मात्र, कार्यकर्ता तरीही घोषणाबाजी करत राहिला. त्यानंतर पुन्हा अजित पवार म्हणाले की, मी पण शेतकरी आहे. मलाही फार कळते. तुला कोणी लंकेंनी पाठवले का? ज्या गावच्या बोरी असतात
त्याच गावच्या बाभळी असतात. कशाला मला बोलायला लावता, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावले.