Thursday, November 7, 2024

मोठी बातमी! महाविकास आघाडीचं ठरलं? आज संयुक्त पत्रकार परिषद, मोठी घोषणा करण्याची शक्यता

माय महाराष्ट्र न्यूज : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील जगावाटप जवळपास संपलेले आहे.

महायुतीच्या तिन्ही पक्षांत सर्वच जागांवर तोडगा निघाला आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता राज्यातील जनतेला अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या याद्यांचीही प्रतीक्षा आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार

आज महाविकास आघाडीचे तिन्ही घटकपक्ष एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीत विदर्भातील काही जागांवरून वाद चालू आहे. या भागात काँग्रेसचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे आम्हीच या भागात जास्त

जागा घेणार असा काँग्रेसची भूमिका आहे. या भागात काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 8 जागा देण्यासाठी तयार आहे. तर ठाकरे यांच्या पक्षाने या भागात एकूण 12 जागांवर दावा सांगितला आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचा आमदार नाही. त्यामुळे या जागा

आम्हाला द्याव्यात, असे ठाकरेंच्या पक्षाचे मत आहे. याच कारणामुळे मविआ सध्या एकमेकांविषयी नाराजीचा सूर आहे.  महाविकास आघाडीतील हाच वाद सध्या संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागावाटपावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी मविआत बैठका, भेट

यांचे सत्र चालू आहे. 20 ऑक्टोबर रोजी ठाकरे यांच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अडीच तास चर्चा झाली.

या सर्व भेटसत्रांनंतर आता महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 21 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे

नेते अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे. आमचे सगळे ठरले आहे. उद्या जागा वाटप जाहीर होणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. 20 ऑक्टोबर रोजी शरद पवार, जंयत पाटील, संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देसाई

वरील माहिती दिली. त्यामुळे पत्रकार परिषद झालीच तर मविआचा जागावाटपाचा फॉर्म्यूला नेमका काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!