Friday, January 3, 2025

जयश्री थोरातांचा विखे पिता -पुत्राला सज्जड इशारा म्हणाल्या खबरदार माझ्या बापाविषयी ….

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:संगमनेर तालुक्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे खरे स्वाभिमान आहेत. जर कोणी आमचा स्वाभिमान दुखाविण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या बापाविषयी कोणी काही बोलले तर ते खपवून घेणार नाही. हा बाप

माझ्या एकटीचा नाही तर संपूर्ण तालुक्यातील मुलामुलींचा बाप आहे असा गर्भित इशारा युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सुजय विखेंच्या टीकेला उत्तर दिले.मतदारसंघातील विविध गावांमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात यांच्या

युवा संवाद यात्रा सुरु आहे. त्यानंतर जोर्वे येथील शिव ओमकार मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत युवकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर राहता तालुक्याच्या नेत्या प्रभावती घोगरे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात

सह. साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांसह जोर्वे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या की, आ. बाळासाहेब थोरात यांचा दहा-बारा लोकांचा परिवार नाही तर संपूर्ण तालुक्यातील सात लाख लोकांचा परिवार आहे.

या तालुक्याकडे आणि माझ्या बापाकडे जर कोणी वाकड्या डोळ्यांनी पाहिले तर तुम्हाला हा तालुका तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा खणखणीत इशारा यावेळी दिला.राज्यामध्ये अडीच वर्षापूर्वी राज्यात तोडून फोडून खोके सरकार सत्तेवर आले.

तेव्हापासून त्यांनी आ थोरात यांना त्रास देण्याचे काम सुरू केले. बाळासाहेब थोरात यांनी कधीच कुणाचे वाटोळे केले नाही कोणाला ही त्रास दिला नाही. विरोधक आहे म्हणून कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले नाही. उलट गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजे

म्हणून आमदार थोरात यांनी या तालुक्यातील विरोधकांचे सुद्धा विविध महाविद्यालयांना परवानगी मिळवून दिली. ते कधीच कुणाबरोबर वाईट वागले नाही तुमचे असे त्यांनी काय वाईट केले तुम्ही एवढा त्यांना त्रास देत आहात असा खडा सवाल यावेळी थोरात यांनी विचारला.

गेली 50 वर्षापासून राहाता तालुका त्यांच्या ताब्यात आहे. त्या तालुक्याची त्यांनी काय हालत करून ठेवले आहे ते जरा जाऊन बघा त्यांनी कधीच कुणाला मोठे होऊ दिले नाही अशा लोकांना आपल्या तालुक्याच्या घरात घ्यायचे आहे का? याचा प्रत्येकाने विचार करावा शिर्डी विधानसभा

मतदारसंघात २००९ मध्ये ते स्वतः पडता पडता वाचले होते. एवढी ताकद या मतदारसंघातील २८ गावांची आहे. जर तुम्ही या २८ गावांसह संपूर्ण तालुक्याला तम्ही त्रास दिला नसता तर ही गावे तुमच्याबरोबर राहिली असती. परंतु तुम्ही फक्त आणि फक्त त्रास देण्याचे काम केले आहे.

जोर्वे गाव हे आ. बाळासाहेब थोरात यांचे गाव आहे. या गावातील कुठल्याही माणसाला जर तुम्ही त्रास दिला तर मी नुसते बोलत नाही तर करून दाखवीन असा खणखणीत इशारा डॉ. थोरात यांनी विखे पिता – पुत्राला देत आता या मतदारसंघामध्ये असणारी त्यांची दहशत

मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.राहता तालुक्यातील बाभळेश्वरचा दूध संघ बंद पडला तसेच गणेशनगर साखर कारखाना आठ वर्षापासून बंद होता तर राहुरी साखर कारखान्याचे त्यांनी काय केलं आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे

त्यांच्या संस्था कर्जात बुडाल्या आहे. ज्यांना त्यांच्या स्वतःच्या संस्था जपता येत नाही ते आपल्या संस्थाचे काय करतील असा सवाल उपस्थित करत ज्यांचा अभ्यासच कच्चा आहे. एवढा मोठा संगमनेर तालुका त्यांना काय झेपणार असा सवाल यांनी डॉ. जयश्री थोरात यांनी विखेंना केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!