नेवासा/प्रतिनिधी
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या समवेत केवळ चार व्यक्तींना प्रवेश असल्याने केवळ चारच व्यक्तींना सोबत आणायचे आहे,चार पेक्षा जास्त व्यक्तींना आणून आचारसंहितेचा भंग करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात श्री.जाधव यांनी म्हंटले आहे की, नेवासा विधानसभे करिता दि. 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नेवासा तहसील कार्यालयात
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या समवेत केवळ चार व्यक्तींना प्रवेश असल्याने केवळ चारच व्यक्तींना सोबत आणायचे आहे, चार पेक्षा जास्त व्यक्तींना आणून आचारसंहितेचा भंग करू नये.
नेवासा तहसील कार्यालय परिसरामध्ये जागा अपुरी असल्याने तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी शक्यतोवर वाहने आणू नयेत किंवा चार चाकी वाहनांचा वापर टाळावा. दुचाकी आणल्यास तहसील कार्यालयाच्या बाहेर जुन्या गोडाऊन शेजारी मोकळ्या जागेत वाहने पार्क करावीत. तहसील कार्यालयाच्या आवारात कोणतीही खाजगी वाहने आणू नयेत.
निवडणूक प्रक्रिया शांतते पार पडावी आणि कायदा सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरिता नेवासा पोलिसांची सक्त तयारी केली असल्याचे ही पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.