नेवासा/प्रतिनिधी
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवार दि.२० ऑक्टोबर रोजी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अपर तहसीलदार पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे आदी उपस्थित होते.