माय महाराष्ट्र न्यूज:निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र सध्या
पाहायला मिळतय. खरेतर, नुकताच काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.या पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश असून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे या यादीत पाहायला मिळालीत.
मात्र नेवासा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव यामध्ये नव्हते. खरंतर नेवासा विधानसभा मतदार संघात भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे 2014 ला विजयी झाले आहेत.यामुळे ही जागा महायुती कडून भाजपाच्या वाटेला जाईल असे म्हटले जात आहे.
पण भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत नेवासा विधानसभा मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा केली नाही यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये पेच आहे कां अशा चर्चांना ऊत आला आहे.दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला
जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना ही उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.यावर वरिष्ठ पातळीवर एक मत झाले आहे आणि मुरकुटींचे नाव फायनल झाले आहे अशी माहिती समोर आली आहे.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी 2014 सालघ निवडून गेल्यानंतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे केली आहे आणि तालुक्यातील सर्व भाजपाचे पदाधिकारी यांनी मुरकुटे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी ही वरिष्ठ पातळीवर केली आहे. येत्या एक-दोन
दिवसात भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार आहे त्या यादीमध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव येणार असल्याचे भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे नेवासा विधानसभा
भाजपाकडून बाळासाहेब मुरकुटे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शंकराव गडाख अशीच लढत पुन्हा तालुक्यात बघायला मिळणार आहे.