नेवासा
तालुक्यातील येथे एका सराईत गुन्हेगारास नेवासा पोलिसांनी धारदार शस्त्र बाळगताना पकडले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
या बाबद अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक धनजंय जाधव नेवासा पोस्टे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की पोलीस ठाणे नेवासा गुन्हा रजि नं १२७८/२०२३ भा.द.वि.क. ३६३, ३६६ (अ), ३७६ (२), सह पोस्को ४, ६, १७ मधील पाहिजे आरोपीनामे शाम मदन चव्हाण रा खांडवी ता गेवराई जि बीड हा नेवासा खुर्द मार्केट यार्ड जवळील मोकळया जागेत एका स्वीप्ट डिझाईर गाडी नं एम एच ०५ बी जे २५८१ यामध्ये मित्रासोबत थांबलेला आहे व त्यांचेजवळ लोखंडी तलवार व चाकु आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक धनजंय जाधव नेवासा यांनी त्यांचे कक्षात पोसई विकास पाटील, पोना गांगुर्डे, पोकों करंजकर, पोर्को वासुदेव डमाळे, पोकों आप्पा तांबे, पोकों अवि वैदय, पोकों राम वैदय, पोकों अतुल शेळके यांना सदर बातमीचा थोडक्यात आशय समजावुन सांगुन कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने पोसई विकास पाटील यांनी लागलीच दोन लायक पंचाना बोलावुन घेतले व सदर पंच व ही पोलीस स्टाफ असे खाजगी वाहनाने रवाना होवुन बातमीतील ठिकाणी जावुन पाहणी केली असता तेथे एका पांढ-या रंगाच्या स्वीप्ट डिझायर गाडी क्र एम एच ०५ बीजे २५८१ ही नेवासा खुर्द मार्केटच्या मोकळया जागेत मिळुन आली व सदर गाडीमध्ये तीन इसम मिळुन आले. पोलीस स्टाफ यांनी पंचासमक्ष दुपारी ठिक ०१/३० वा चे सुमारास पंचासमक्ष गाडीस वेढा देवुन त्यांना त्यांचे नाव, पत्ता, विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) शाम मदन चव्हाण रा खांडवी ता गेवराई जि बीड २) सुरज रमेश सुर्यवंशी रा. बागपिंपळगांव. ता. गेवराई. जि. बीड ३) संतोष नंदु सावंत रा. संजयनगर, ता गेवराई.जि. बीड असे सांगितले सदरवेळी पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये अनुक्रमे १) १०००/- रुपये किंमतीची एक सुमारे १४.५ इंच लांबीचे धारदार पाते असलेली लोखंडी तलवार तिचे टोकाचे बाजुला वाक असलेला व त्यास सुमारे ४ इंच लांबीची मुठ असलेली २) ५००/- रुपये किंमतीचा एक लोखंडी चाकु त्यास ९.५ इंच लांबीचे धारदार पाते व ४.५ इंच लांबीची लोखंडी व प्लास्टीकची मुठ असलेली ३) २,५०,००० /- रुपये किंमतीची एक पांढरे रंगाची स्विप्ट डिझाईर चारचाकी गाडी तिचे पुढील व मागील पिवळे रंगाचे नंबर प्लेटवर एम एच ०५ बी जे २५८१ ही पंचासमक्ष ताब्यात घेवुन व वर नमुद दोन अवैध शस्त्र पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे.
सदर बाबत वर नमुद तीन आरोपीत विरुध्द आपले कब्जात बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं.972/ २०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये पोना अरुण गांगुर्डे ब नं ६९४ यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयांचा पुढील अधिकचा तपास पोहेकों राजेंद्र केदार हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, श्री राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनजंय जाधव, पोसई विकास पाटील, पोना गांगुर्डे, पोकों करंजकर, पोकों वासुदेव डमाळे,पोकों आप्पा तांबे, पोकों अवि वैदय, पोकों राम वैदय, पोकों अतुल शेळके यांनी केलेली आहे. सदर गुन्हांचा पुढील अधिकचा तपास पोहेकॉ केदार हे करीत आहेत.
*नागरिकांना आवाहन…
नागरीकाकडे अशा प्रकाराची कोणतीही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक धनजंय जाधव पोलीस ठाणे नेवासा यांना मोबाईल फोनद्वारे कळविण्यात यावी माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्याची हमी देण्यात येत आहे.