Sunday, March 29, 2026

भेंडा येथील पसायदान कलेक्शनचे उद्या उदघाटन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे श्री संत नागेबाबांची पावनभूमीत नव्याने सुरू होत असलेल्या पसायदान कलेक्शन या भव्य कापड दुकानाचे उद्घाटन आज रविवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होत असल्याची माहिती पसायदान उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव पाठक यांनी दिली.

श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे गुरूवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज व नजीक चिंचोली खड़ेश्वरी देवस्थानचे ह.भ.प. गणेशानंदगिरीजी महाराज यांचे आशीर्वादाने व कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. निर्मलाताई शुभम नवले,डॉ.सौ. निवेदिता उदयन गडाख यांचे प्रमुख उपस्थितीत पसायदान कलेक्शनचा शुभारंभ होत आहे.
एकाच दालनात संपूर्ण परिवाराची परिपूर्ण वस्त्रसंपदा मिलमधून थेट ग्राहकांसाठी होलसेल दरात उपलब्ध होणार आहे.

भेंडा येथील नागेबाबा मार्ट मध्ये सूरु होत असलेल्या या नवीन दालनाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
पसायदान उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव पाठक, किशोर भणगे, गोडसे यांनी केले आहे

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!