Thursday, November 7, 2024

पसायदान कलेक्शनने उंच गरुड भरारी घ्यावी-निर्मलाताई नवले

भेंडा

मराठी माणूस उद्योग व्यवसायामध्ये येत आहे आणि फक्त उद्योग व्यवसायामध्ये येत नाही तर तो यशस्वीपणे आपली ओळख निर्माण करतो आहे.त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पसायदान उद्योग समूह.या उद्योग समुहाने सूरु केलेल्या पसायदान कलेक्शनने भेंडा गावा पुरते मर्यादित न रहाता ऑनलाईन शॉपिंगमध्ये उतरून देशभरात गरुड भरारी घ्यावी अशा सदिच्छा इंस्टाग्रामवर सुमारे ५ लाख फॉलोर्स असलेल्या कारेगाव (पुणे) ग्रामपंचायतीच्या युवा सरपंच व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सौ.निर्मलाताई शुभम नवले यांनी दिल्या.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे श्री संत नागेबाबांची पावनभूमीत नव्याने सुरू केलेल्या पसायदान क्लेक्शनचे उद्घाटन
सरपंच सौ.निर्मलाताई शुभम नवले यांचे हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.नागेबाबा मल्टिस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, चिंचोली खड़ेश्वरी देवस्थानचे गणेशानंदगिरी महाराज,अंकुश महाराज कादे, महाराज पाठक ,अंजाबापू महाराज कर्डिले,महादेव महाराज घाडगे,करण नवले, बाळासाहेब नवले, राजू शेटे,माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे, सिद्घांत नवले,नामदेव निकम, गणेश गव्हाणे, भाऊसाहेब फुलारी, सोपान महापुर,सुरेंद्र थोरात, भेंडा गावच्या सरपंच रोहिणी निकम, चिंचोलीच्या माजी सरपंच संगीताताई पाठक, मनिषा फुलारी व्यासपीठावर उपस्थित होते.

सौ.नवले पुढे म्हणाल्या की, राजकरणात येतांना माझ स्वप्न होतं ते आपल्या गावामध्ये विकास कामे करून महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाची ओळख निर्माण करण्याच. माझ्या घरच्यांचे आशीर्वाद आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे मी कारेगावमध्ये अतिशय उत्तम रित्या काम करू शकले.
आपल्याला घरातूनच सांगितलं जाते की तू नोकरी कर, परंतु आता युवा वर्ग जो आहे त्याचा कल हा उद्योग-वयवसायाकडे आहे. नोकरी ही फक्त तुमची गरज पूर्ण करते, परंतु व्यवसाय हे तुमचे स्वप्न पूर्ण करतात. व्यवसाय करण्यासाठी भांडवल महत्त्वाचे आहेच परंतु भांडवला पेक्षाही
प्लॅनिंग,आत्मविश्वास आणि मार्केटिंग हेही महत्वाचे असते.
पसायदान कलेक्शनने लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठान पर्यंत सर्वांचा विचार केलेला आहे.ग्राहकाकडे आलेला ग्राहक हा देव असतो हे उद्योजकांनी लक्षात ठेवले पाहिजे.ग्राहकांचा आदर केला पाहिजे. व्यावसायिकांच्या वाणीत मधुरता आणि वागण्यामध्ये नम्रता देखील असली पाहिजे. ग्राहक आवर्जून आपल्या शोरूममध्ये शॉपिंग करण्यासाठी यावे या करिता वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स, माध्यमांमधून युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत पोहचले पाहिजे.
पसायदान कलेक्शन भेंडा गावा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आपली वेगळी ओळख कशी निर्माण होईल त्यासाठी नियोजन करावे, ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून संपूर्ण देशभरासाठी आपल्याला ग्राहकांना सेवा कशी देता येईल याचा तुम्ही नक्कीच आवर्जून विचार
करावा.

कडूभाऊ काळे म्हणाले की,ज्यांना खरंच धंदा करायचा आहे ज्यांना खरंच बिजनेस मॅन बनायचं त्यांनी शिवाभाऊ पाठक यांना समजून घ्यावं. ते आज जे काही आहेत त्याच्या मागे खूप कष्ट आहेत. झाड लावलं की लगेच फळ मिळत नाही ,तसेच कोणताही धंदा यशस्वी व्हायचा असेल तर आपल्या त्या व्यवसायात सातत्य ठेवून किमान १००० दिवस वाट पहावी लागेल.
उदयन गडाख, गणेशानंदगिरी महाराज,गणेश गव्हाणे,करण नवले यांनी ही मनोगत व्यक्त केले.
माजी आ.पांडुरंग अभंग,विठ्ठलराव लंघे यांचेसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
पसायदान उद्योग समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव पाठक यांनी प्रास्ताविक केले.
किशोर भणगे, अभिषेक गोडसे,बद्रीनाथ मते, शितल मते

यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले.डॉ.रेवणनाथ पवार,गणेश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!