Thursday, November 27, 2025

नेवासा विधानसभेकरिता 1601 कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

221 नेवासा विधानसभा मतदार संघाच्यावतीने निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी नेवासा येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.दिवसभरातील दोन सत्रात 1601 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.

रविवार दि.27 ऑक्टोबर रोजी सकाळ व दुपार असा सत्रात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम सत्रात 742 व द्वितीय सत्रात 859 अधिकारी – कर्मचाऱ्यांनी‌ प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

प्रशिक्षण सत्राच्या प्रथम व द्वितीय सत्राला
निवडणूक निर्णय अधिकारी अरुण विलास उंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान तहसीलदार संजय बिरादार व गट विकास अधिकारी शसंजय लखवाल हे उपस्थित होते.
सदरचे प्रशिक्षण नेवासा येथील रामलीला लॉन्स नेवासा व ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा येथे मतदार यंत्र हाताळणी बाबतचे प्रशिक्षण पार पडले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!