शेवगाव
दिवाळी पूर्वी उस बिलाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगाव तहसीलदार यांना सोमवार दि. २८ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या साखरेच्या वाढलेल्या किमती तसेच इथेनॉलचे वाढलेले भाव हा सर्वांचा फरक म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळी पूर्व प्रती टन दोनशे रुपयांची मागणी केली आहे. तसेच काही कारखानदारांनी उशिराने पेमेंट केल्याने त्या रकमेवर १५ टक्के व्याज शासनाच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा तसेच चालू गळीत हंगामाचा उसाचा दर जाहीर करावा, त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या उसा पासूनच साखर होत असल्या कारणाने ज्या शेतकऱ्यांना चालू वर्षी कारखान्यांना ऊस घातला आहे. अशा प्रति शेतकऱ्यांना पंचवीस रुपये प्रति किलो साखर शेतकऱ्यांना देण्यात यावी, कारखान्या मधील कर्मचाऱ्यांचा एक पगार म्हणून दिवाळी बोनस म्हणून जाहीर करावा, कापूस प्रति क्विंटल १० हजार रुपये दराने खरेदी करावा व त्यासाठी शासनाची सीसीआय कापूस खरेदी केंद्र चालू करावे अश्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
सध्या सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी चालू असल्याकारणाने मतलबी पुढारी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, कापूस, सोयाबीन आणि ऊस या पिकाचे दर पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. याचा विचार न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता मा तहसीलदार यांच्या कार्यालयात दिवाळीनंतर आंदोलनात करतील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, रमेश कचरे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, मेजर अशोक भोसले, तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गर्जे, मच्छिंद्र आर्ले, संतोष गायकवाड, अमोल देवढे, व उस उत्पादक शेतकरी यावेळी हजर होते.
शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन स्वीकारले.