Tuesday, April 22, 2025

नगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार बदलणार?

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारं वाहत आहे विविध पक्षाने उमेदवारी जाहीर करून त्या त्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी महायुतीमध्ये

बंडखोरी बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी अपक्ष हे मैदानात उतरले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातून भाजपाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. यामुळे नगर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसतो की काय असे बोलले जात आहे झाले असे की श्रीगोंदा

विधानसभा मतदारसंघातून भाजपनं प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र, प्रतिभा पाचपपुते यांनी विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षाकडे मागणी केली होती. मात्र, पक्षानं प्रतिभा पाचपुते यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. उमेदवारी

अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पक्षाकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार असून न ऐकल्यास सोमवारी अर्ज मागं घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

गेली पाच वर्ष पाचपुते साहेब आजारी असल्यानं मुंबईची कामं विक्रमसिंह पाहत होता. विक्रम कामं पाहायचा आणि साहेब आमदार म्हणून असायचे. तर, मला वाटतं तोच कामं पाहतो तर तोच आमदार का नाही? जर तो स्वत: आमदार असेल तर चागंलं काम करु शकेल, असं वाटतं. माझं तिकीट जाहीर झाल्यानंतर

फडणवीस साहेबांना विक्रमला तिकीट द्या असं सांगायला गेले होते. मात्र, त्यांनी सांगितलं की आता फिक्स झालंय तुम्हीच उभं राहा. मुंबईहून आल्यावर मी प्रचाराला सुरुवात केली.प्रचाराला सुरुवात केल्यानंतर बाहेर राहावं लागायचं. त्यामुळं कळत नकळत पाचपुते साहेबांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं.

आमच्याकडे केअरटेकर आहे, पण त्याच्याकडून साहेबांचं एकदा दोनदा औषध चुकलं होतं. त्यामुळं माझं पत्नी म्हणून कर्तव्य आहे की पहिलं साहेबांची तब्येत आणि नंतर आमदारकी, असं प्रतिभा पाचपुते म्हणाल्या. 1984 पासून बबनराव पाचपुते यांची पत्नी आहे. तेव्हापासून साहेब सलग आमदार आहेत, मी तेव्हापासून

आमदारांची पत्नी आहे. आता आमदाराची आई व्हायला काय हरकत आहे, असं प्रतिभा पाचपुते म्हणाल्या. प्रतिभा पाचपुते पुढं म्हणाल्या, कार्यकर्त्यांना पाचपुते कुटुंबातील माणूस हवा आहे. आमचे कार्यकर्ते चिवट कार्यकर्ते आहेत. पाचपुते साहेब सात वेळा सात चिन्हावर निवडून आले आहेत.

कार्यकर्त्यांना पक्ष माहिती नाही की चिन्ह माहिती नाही फक्त पाचपुते साहेब हवे आहेत. बॅलेट पेपरवर माझ्या नावापाठीमागं पाचपुते साहेबांचं नाव असेल किंवा विक्रमच्या नावापुढं देखील पाचपुते साहेबांचं नाव हवं आहे, असं प्रतिभा पाचपुते म्हणाले. दरम्यान विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी

यासाठी भाजप उमेदवार प्रतिभा पाचपुतेही आग्रही आहेत. प्रतिभा पाचपुते पक्षाकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार आहेत. पक्षानं न ऐकल्यास सोमवारी स्वतःचा अर्ज मागे घेणार आहेत. बबनराव पाचपुते यांच्या तब्येतीचे कारण देत प्रतिभा पाचपुते माघार घेणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!