Thursday, December 12, 2024

नेवासा विधानसभा निवडणूकीत १२ उमेदवार रिंगणात “शंकरराव गडाख-विठ्ठलराव लंघे-बाळासाहेब मुरकुटे यांच्यात तिरंगी लढत”

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

 

 

नेवासा/प्रतिनिधी:२२१ नेवासा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या २४ पैकी १२ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांनी दिली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अब्दुल शेख यांनी अर्ज मागे घेण्यास काही मिनिटे शिल्लक असतांना अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला.त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेचे शंकरराव गडाख, महायुतीचा घटक पक्ष शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे व प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळासाहेब मुरकुटे अशी तिरंगी लढत होणार आहे. तर वंचितचे पोपट सरोदे, बसपाचे हरिभाऊ बहिरु चक्रनारायण हे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार ही निडणुकीच्या मैदानात आहेत.

 

नेवासा विधानसभेसाठी २४ व्यक्तींनी उमेदवारी अर्ज भरले होते. छाननीमध्ये २ उमेदवारी अर्ज बाद झाल्याने ३१ उमेदवारी अर्ज शिल्लक होते. आज सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

 

*निवडणूक रिंगणात असलेले राजकिय पक्षांचे उमेदवार व त्यांचा पक्ष असे…

 

शंकरराव यशवंतराव गडाख (शिवसेना उबाठा), विठ्ठलराव वकिलराव लंघे (शिवसेना), बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (प्रहार जनशक्ती पक्ष),

हरिभाऊ बहिरु चक्रनारायण (बहुजन समाज पार्टी), पोपट रामभाऊ सरोदे (वंचीत बहुजन आघाडी)

 

————-

*निवडणूक रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार असे…

ज्ञानदेव लक्ष्मण कांबळे,मुंकुंद तुकाराम अभंग,ज्ञानदेव कारभारी पाडळे,वसंत पुंजाहारी कांगुणे,सचिन प्रभाकर दरंदले,जगन्नाथ माधव कोरडे ,शरद बाबुराव माघाडे.

 

 

————–

 

*उमेदवारी मागे घेणारे अर्जदार असे….

 

अब्दुल लालाभाई शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),सुनिता शंकरराव गडाख (अपक्ष),आशाताई दादासाहेब मुरकुटे (अपक्ष), रत्नमाला विठठलराव लंघे (अपक्ष),सचिन मदनलाल देसरडा (अपक्ष),ऋषिकेश वसंत शेटे (अपक्ष)शशिकांत भागवत मतकर (राष्ट्रीय समाज पक्ष), संतोष नानासाहेब काळे (अपक्ष),अड.अजित बबनराव काळे (अपक्ष), रविराज तुकाराम गडाख (अपक्ष),गोरक्षनाथ पंढरीनाथ कापसे (अपक्ष), रामदास रावसाहेब चव्हाण (अपक्ष)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!