पाथर्डी
मी केलेल्या पाच वर्षांतील कामांची व त्यांनी केलेल्या दहा वर्षांच्या कामाची तुलना करा. आम्ही खोदलेल्या जायकवाडी धरणाच्या चरातूनच तुम्ही अजून पाणी देण्याचे काम करता. गेली तीस वर्षे आलटून पालटून सत्ता भोगण्याची यांनी काम केले. मात्र, विकास न करता केवळ कार्यकर्त्यांची जिरवाजिरवी करण्याचा उद्योग केला. या निवडणुकीत मला विजयी करा. तुम्हाला वचन देतो की भाऊ म्हणून अर्ध्या रात्री मी तुमच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.
पाथर्डी शहरातील खोलेश्वर मंदिराच्या प्रांगणात घुले यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सुरेश आव्हाड होते.
महंत माधवबाबा, क्षितिज घुले, बाळासाहेब ताठे, चांद मणियार, बबनराव बोरुडे, रवींद्र म्हस्के, विलास रोडी, दत्ता खोरदे, दत्ता टेंभूरकर, बबन सबलस, आदिनाथ देव्हडे, किसन आव्हाड, संदीप काकडे, देविदास मरकड, आसाराम ससे, फारूक शेख आदी उपस्थित होते.
यावेळी संजय बडे व महेश बोरुडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी घुले गटात प्रवेश केला.
माजी आ.घुले पुढे म्हणाले की, तुमच्या जीवावर २००९ साली मी आमदार होत इतिहास घडवला होता. आता या निवडणुकीत सुद्धा आपल्याला इतिहास घडवायचा असल्याने तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा.
आपली सुरुवात हळूहळू होते. मात्र, शेवटी योग्य कार्यक्रम होतो. मी केलेल्या पाच वर्षांतील कामांची व त्यांनी केलेल्या दहा वर्षांच्या कामाची तुलना करा. आम्ही खोदलेल्या जायकवाडी धरणाच्या चरातूनच तुम्ही अजून पाणी देण्याचे काम करता. गेली तीस वर्षे आलटून पालटून सत्ता भोगण्याची यांनी काम केले. मात्र, विकास न करता केवळ कार्यकर्त्यांची जिरवाजिरवी करण्याचा उद्योग केला. या निवडणुकीत मला विजयी करा. तुम्हाला वचन देतो की भाऊ म्हणून अर्ध्या रात्री मी तुमच्या पाठीशी उभा राहील. माझ्या विजयाची चिंता करू नका. काल जो सर्व्हे आला त्यामध्ये मी विजयाचा
गुलाल घेणारच आहे. निवडणूक आली की जातीपातीचे घाणेरडे राजकारण करण्याचा उद्योग करतात. दहा वर्षे विकास केला म्हणतात. मात्र, आजही शहरातील दलित वस्तीत वीज नसल्याने मी विजेचे पोल बसवले. भारजवाडी गावात १९७२ नंतर एकही विकासकाम झाले नव्हते. तेथील तलावाच्या दुरुस्तीसाठी मी शासनाला जीआर बदलायला लावला अन् तलावाचे काम केले. विकासाचे यांना काहीही देणे घेणे नाही.
प्रास्ताविक बाळासाहेब ताठे, सूत्रसंचालन चांद मणियार, तर आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले.
*मित्राला शेवगाव तालुक्यातून मताधिक्य दिले,मात्र……मी आमदार झाल्यावर बेरजेचे राजकारण केले. जे विरोधक होते त्यांना सोबत घेतले. मात्र, त्यानंतर माझी हौस फिटली. मागच्या निवडणुकीत मी प्रामाणिक काम करत मित्राला शेवगाव तालुक्यातून मताधिक्य दिले. मात्र, त्यांना स्वतःच्या पाथर्डी तालुक्यात मते घेता आली नाही. मी घरात घेतले, यात माझी काय चूक, असेही घुले म्हणाले.