Thursday, December 12, 2024

भाजपाचे नितीन उदमलेंकडून श्रीरामपूर विधानसभेसाठी सागर बेग यांना पाठिंबा

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले हे महायुतीकडून इच्छुक होते. तसे प्रयत्न वरीष्ठ पातळीवर झाले. तसे प्रयत्न करण्यात आले.

कारण नितीन उदमले यांच्याकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांला मोठं आव्हान उभे केले असते. परंतु उदमलेंना तिकीट न देता आपल्या मर्जीतील उमेदवारला महायुतीमध्ये घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार लहू कानडे व शिंदे गटाकडून

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देऊन महायुतीकडून दोन उमेदवार देऊन महाविकास आघाडीला याचा फायदा होऊ शकतो.दरम्यान माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले यांची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हारल होत आहे.

त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की श्रीरामपूर मतदारसंघामध्ये भगवा फडकणार हे नक्की असताना दरबारी राजकारणाचा खेळ खेळत हिंदुद्वेष्टा, प्रभू रामचंद्र द्वेष्टा, बामसेफी, जातीयवादी उमेदवार लादण्याचा डाव खेळला गेला. जागरूक हिंदूंनी आपण मेंढरे नसून सजग आहोत, हे सिद्ध करत आपली शक्ती दाखवण्याची आवश्यकता आहे.

सागर भैया बेग यांच्या पाठीशी ताकद उभा करण्याची हीच ती वेळ आहे. राजकारण होत राहील, नेते येतील आणि जातील पण हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला विश्वास वाटला पाहिजे. की हिंदू त्याच्या पाठीशी आहेत. असे या पोस्ट मध्ये लिहिले आहे.उदमले यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर सागर बेग यांना पाठिंबा

देऊन एक प्रकारे हिंदू धर्मांवर आदर दाखवून मतदारसंघातील जनतेचा पुन्हा एकदा विश्वास निर्माण केला आहे उदमले यांनी बेग यांना पाठिंबा दिल्यामुळे निश्चित बेग यांची ताकद वाढणार आहे तसेच निवडणुकीत फायदा होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!