Thursday, December 12, 2024

नेवासा तालुक्यातील सर्व बसस्थानकाजवळ नो-पार्किंग फलक लावण्याची मागणी

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

  नेवासा तालुक्याच्या हद्दीतील सर्व राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावर असणाऱ्या सर्वच बस स्थानक व बस थांब्याजवळ १०० मीटर अंतर नो-पार्किंग फलक तातडीने लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कारभारी गरड यांनी रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी यांचाकडे केली आहे .

      
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री.गरड यांनी म्हटले आहे की , नेवासा तालुक्यातुन जाणाऱ्या नेवासा-शेवगाव , नेवासा-श्रीरामपुर , पांढरीपुल-घोडेगाव -वडाळा-प्रवरासंगम , कुकाणा-चांदा -घोडेगाव-सोनई -राहुरी , नेवासा -खडका फाटा -सलाबतपुर-शिरसगाव – वरखेड , कुकाणा -गेवराई -शिरसगाव यासह इतर मार्गावरील बस थांबे आणि बस स्थानका लगतच खाजगी अवैध वाहतुकीची सर्व वाहने सर्रास उभी असतात .
तिथेच प्रवासी भरणे व उतरविण्याचे काम चालू असल्याने एसटीला तेथे थांबण्यास अडथळा निर्माण होतो. अशा ठिकाणी बस थांबू शकत नसल्याने एकतर थांब्यापासुन लांब मागे किंवा पुढे उभी राहते. त्यामुळे प्रवाशांना पळत जावे लागते. वृध्द , रुग्ण , अपंग यांची दमछाक होते. किंवा बस थांबलीच तर ती मध्ये रस्त्यावरच उभी राहिल्याने इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीस अडथळा येतो व मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते . ही समस्या नेवासा , भेंडा ,कुकाणा , सलाबतपुर ,सिरसगाव , घोडेगाव , वडाळा , प्रवारासंगम , चांदा , सोनई , या गावातील प्रवासी , वाहनचालक व नागरिकांना सतत जाणवते . अवैध प्रवासी वाहन चालकांस कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते अरेरावी करतात.
नो-पार्किंग फलका बाबत सार्वजनिक बांधकाम खात्याशी संपर्क केला असता व्यवस्थित सांगीतले जात नाही. पोलिस खात्याशी संपर्क केला तर सर्व ठिकाणी वाहतुक पोलिस नाहीत, अवैध वाहनांवर कारवाई करु असे सांगीतले जाते. मात्र आमच्या बस चालकांना त्रास सहन करावा लागतो , असे वाहतुक नियंत्रक म्हणतात.
त्यामुळे रस्ता सुरक्षा  समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनीच या महत्वपुर्ण समस्येत तातडीने लक्ष घालुन जिल्ह्यात सर्वत्र नो पार्किंग फलक लावण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत , अशी मागणी अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कारभारी गरड यांनी केली आहे.
    

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!