Thursday, December 12, 2024

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले अब्दुल शेख यांचे कौतुक

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

श्रीरामपूर

नेवासा विधानसभेचे उमेदवार अब्दुलभैय्या शेख यांनी राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत ए.बी. फॉर्म असताना देखील माझ्या शब्दावर उमेदवारी मागे घेतली अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेख यांचे कौतुक केले.

श्रीरामपूर येथील जाहिर सभेत अजितदादा बोलताना म्हणाले की, नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचा ए. बी. फॉर्म आम्ही अब्दुलभैय्या शेख यांना दिला होता. नेवासा मधून अब्दुलभैय्याला उभ केलं होत. परंतु ए. बी. फॉर्म असताना देखील माझं अब्दुलभैय्याने ऐकलं आणि उमेदवारी मागे घेतली. माझ्या शब्दावर अब्दुलभैय्याने माघार घेतली. तिथं नेवासाचे महायुतीचे उमेदवार लंघे आहेत, तिथं अब्दुलभैय्या शेख महायुतीचे काम करतोय. श्रीरामपुर मध्ये देखील भाऊसाहेब कांबळे यांना माघार घेण्यासाठी सांगितली होती आणि लहुजी कानडे यांना श्रीरामपूर मधून महायुतीचे उमेदवार जाहिर केले होते. पण भाऊसाहेब कांबळे अर्ज माघारीच्या दिवशी उपलब्ध न झाल्याने त्यांचा फॉर्म राहिला.श्रीरामपूर येथे मुख्यमंत्री शिंदे यांची सभा होणार होती ,परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांना सभा घेऊ नका असे सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी श्रीरामपूरची सभा रद्द केली.त्याच सभेच्या मंडपमध्ये ही सभा होत आहे .
यावेळी जाहिर सभेत अब्दुलभैय्या शेख यांना सन्मानाने पुढे बोलवत आभार मानत अभिनंदन केलें. अजित पवार यांनी अब्दुलभैय्यांचे कौतुक करत सांगितले की अब्दुलभैय्याने माझे म्हणणे ऐकले आणि राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत ए.बी. फॉर्म असताना देखील उमेदवारी मागे घेतली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!