नेवासा
विधानसभा निवडणूक अनुषंगाने नेवासा पोलिसांकडून नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबविन्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांनी श्रीरामपूर रोड वरील सुरेगाव कमान येथे आज बुधवार दि.१३ नोव्हेबर रोजी नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम राबविन्यात आली.
तसेच उमेदवारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा 221 नेवासा यांनी पाठवलेल्या पत्राच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्रचार मधील ज्या वाहनांची परवानगी घेतलेली आहे त्या वाहनांच्या नंबर प्लेट इतर वाहनांना लावून प्रचार करीत असल्याबाबत तक्रार तसेच ध्वनी प्रदूषण तक्रारिच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी वेगवेगळे पथके तयार करून तालुक्यात दि.१२ रोजी वहानांची अचानक तपासणी केली.
यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व पो. कॉ. अरविंद वैद्य (प्रवरा संगम),पो. उपनिरीक्षक ससाने व पो. कॉ. गणेश जाधव (मधमेश्वर चौक), पो. उपनिरीक्षक अहिरे व पो. कॉ. डमाळे (नेवासा फाटा), पो. उपनिरीक्षक पाटील व पो. कॉ. राम वैद्य (नेवासा शहर), पो. हवा. केदार व पो. कॉ. तांबे (खूपटी रोड), पो. हवा. राठोड व पो. कॉ. आप्पा वैद्य (नेवासा बुद्रुक), पो. ना. संजय माने व पो. कॉ. गोवर्धन पवार (अहिल्यानगर रोड) अशी ७ पथके तयार करून प्रचार वाहनांची
अचानकपणे तपासणी केली.