Friday, November 22, 2024

राजकारणात समाजसेवी कार्याबरोबरचं राजयोग महत्वाचा -खा.निलेश लंके

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

राजकारणात समाजसेवी कार्याबरोबरचं राजयोग तितकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी केले.

नेवासा तालुक्यातील पानेगांव येथील स्वयंभू महालक्ष्मी देवस्थानला केलेल्या नवसपुर्तीकरिता व दर्शनासाठी आले असता ते बोलत होते.
प्रारंभी स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान वतीने सेवेकरी रमेशअण्णा जंगले, अमित जंगले यांनी देवस्थान माहिती देवून खा. लंके यांच्या हस्ते आरती केली.

खा.लंके पुढे म्हणाले की,हूल झपाटी, खोट्या बाता हे सोशलमीडियाच्या जमान्यात चालतं नसून शेवटच्या घटकांपर्यंत सुखदुःखात गेल्या शिवाय पर्याय नाही. सार्वजनिक विकासा बरोबरच वैयक्तिक लाभ मतदार संघात वीस वर्षे पासून सुरु असल्याने जनतेने मतपेटीतून आशिर्वाद दिले. अगोदर पारनेरचा आमदार आणि आता नगर दक्षिणचा खासदार हि समाजसेवेची पावती आहे. कोरोना काळात राज्याला दिशादर्शक ठरणारा कोवीड सेंटर उघडून रात्रंदिवस सहकाऱ्यांना बरोबर घेवून सेवा केली,ते आशिर्वाद कामी आले.
राज्यातला मोठा मतदार संघ म्हणून नगर दक्षिणेची ओळख आहे.शेवटच्या टोकापर्यंत मी तसेच कुटुंबातील चार सदस्य नेहमी सुख दुःखात भेटी सुरु असतात.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लंके यांनी सांगितले कि, भाजप महायुती सरकारने शेतकऱ्यां बरोबरच कोलमडलेला दूध धंदा, बेरोजगारी, जाती पातीत लावलेले वाद, गुजरात राज्यात गेलेले आपले उद्योग याला जबाबदार भाजप महायुती जबाबदार आहे. परंतु काळजी करु नका उद्या आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार असून शेतकऱ्यांना तसेच युवकांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी पानेगांवचे माजी सरपंच संजय जंगले, उपसरपंच दत्तात्रय घोलप, पत्रकार बाळासाहेब नवगिरे,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, किशोर जंगले, संकेत जंगले,दिपक जंगले,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जंगले, सुरज जंगले, विशाल जंगले, आण्णासाहेब विटनोर, कोंडीराम विटनोर,भाऊसाहेब विटनोर, दत्तात्रय विटनोर, आण्णासाहेब बिडे, राजेंद्र महानोर, भय्यासाहेब विटनोर, योगेश पवार, सचिन विटनोर, बाळासाहेब आढाव, नितीन आढाव, प्रमोद विटनोर, गणेश घावटे,नंदकुमार वारुळे, प्रविण वारुळे, प्रदिप टेमक,नितीन टेमक, सुर्यकांत टेमक, सुरेश आढाव, शिवाजी आढाव, जालिंदर जंगले, दिनेश जंगले, साई चिंधे, चाचा जंगले, लक्ष्मण गागरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!