नेवासा
योग्य ठिकाणी गरजेच्या वेळी अन्नदान आणि गोमातेची सेवा हे पुण्याचेच काम असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांनी केले.
भेंडा येथील नागेबाबा पतसंस्था चालवित असेलली प्रेमाचा डबा व गोशाळेच्या उपक्रमास आर्थिक मदत करता यावी याकरिता तयार करण्यात आलेल्या “क्यू आर कोड” चे अनावरण समाधान महाराज शर्मा यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे, ज्ञानेश शिंदे,संजय मनवेलीकर, संजय नवले,सविता नवले,गणेश दळवी, जालिंदर शिंदे,अड. राऊत,भरत दारुंटे,
अनिल कदम,योगिता पटारे यांचेसह नागेबाबा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
शर्मा महाराज पुढे म्हणाले की,
नागेबाबा परिवाराच्यावतीने अहिल्यानगर शहरातील दवाखान्यामध्ये उपचारासाठी येणारे खेडेगावातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी ते दवाखान्यात असेपर्यंत मोफत प्रेमाचा डबा दिला जातो हे अतिशय योग्य ठिकाणी व गरजेच्या वेळी अन्नदान आहे. दुसरे म्हणजे हनुमान टाकळी येथे नागेबाबा गोशाळेमध्ये कत्तलखान्याकडे जाण्यापासून सोडवलेल्या गोमाता व त्यांचे गोवंश यांच्या चाऱ्यासाठी खर्च करून त्यांचे संगोपन केले जाते, हेही अतिशय महत्त्वाचे काम आहे. हे दोन्हीही काम पुण्याचेच काम आणि सत्कर्माचे काम आहेत. हे काम नागेबाबा परिवार करत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सकारात्मक विचाराची व आर्थिक सहकार्याची गरज आहे.
सदर क्यू आर सर्व व्यापारी बंधूंच्या विनंतीनुसार त्यांच्या दुकानात लावण्यात येणार आहेत. सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन ही त्यांनी केले.