नेवासा
निवडणुकीतील रणधुमाळीत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा महत्वाची असल्याने आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार यंत्रणेत भाजपाचे विधानसभा संयोजक सचिन देसरडा,प्रभाकर शिंदे व लाडकीबहीण योजनेसाठी कष्ट घेतलेले अब्दुल शेख हे राजकीय किंगमेकर ठरले असून प्रभावीप्रचार यंत्रनेने लंघे यांना विजयाच्या यशाला गवसणी घातली .
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी नियोजनपूर्वक प्रचाराची धुरा सांभाळली. नेवासा फाट्या वरील मुख्यमंत्री शिंदे यांची तर घोडेगावची खासदार श्रीकांत शिंदे यांची तर कुकाण्यातील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेयांच्या सभा प्रभावी ठरल्या. घोडेगाव सभा श्री देसरडा यांच्या नियोजनात पार पडली तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेसाठी देसरडा यांना पंचगंगाचे प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शन व तर कुकाण्यातील दानवे यांच्या सभेसाठी अब्दुल शेख यांचे सहकार्य मिळाले. घोडेगाव, सोनई परिसरात सचिन देसरडा यांनी मतदारांपर्यंत लंघेसाठी महायुतीच्या जनहिताच्या योजनाची माहिती दारोदारी पटवून दिली. तालुक्यातील सर्व सभा, प्रचारफेऱ्या याचे नियोजन देसरडा यांनी केले.सोशल मीडिया वरील प्रचार यंत्रणे साठी देसरडा यांना बेलपिंपळगावच्या गणेश चौगुले यांनी सहकार्य करत महत्वाची भूमिका बजावली.स्वतःचा उमेदवारी अर्ज माघारी पासून ते लंघे निवडणुकीत यश घेईपर्यंत देसरडा यांनी केलेली राजकीय व्यहरचना लंघे्यांच्यासाठी लाभदायी ठरली तसेच कुकाण्यातील अब्दुल भाई शेख यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतः कार्यालय थातून वीस हजार हुन अधिक महिलांचे अर्ज भरून सहकार्य केले त्या अब्दुल भाई यांनीही लंघे यांच्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचीमिळा लेली उमेदवारी मागे घेत लंघे यांना पाठबळ दिले शिवाय तालुक्यातील महायुतीच्या सभेसाठी महिलांची लक्षणीय उपस्तिती शेख यांच्या परिश्रमाने दिसून आली.
किसनराव गड़ाख,शिवसेनेचे बाळासाहेब पवार,भाजपाचे अंकुश काळे,ज्ञानेश्वर पेचे,ऋषिकेश शेटे यांची भूमिका ही महत्वाची ठरली.