भेंडा/गुहा: राहुल कोळसे : राज्यामध्ये लक्षवेधी ठरलेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल ३४ हजार ७५५ मतांनी पराभव केला.राहुरी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु खरी लढत तनपुरे व कर्डिले यांच्यामध्येच झाली. विशेषतः कर्डिले यांनी राहुरी परिसरातील तनपुरेंच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारत तनपुरे यांच्यापेक्षा पाच हजार अधिकची मते मिळविली. परिणामी कर्डिलेंचा विजय सुकर झाला.
राहुरीकरांनी दिलेले मताधिक्य तसेच नगर व पाथर्डी परिसरातील मतदारांनी भरभरून मते दिल्याने कर्डिलेंना विजयी मताधिक्य मिळविता आले. मतमोजणीच्या प्रारंभीपासूनच कर्डिले यांनी मताधिक्य दाखवून दिले होते. राहुरी शहर व बारागाव नांदूर गट वगळता इतरत्र सर्वच ठिकाणी तनपुरे यांच्यापेक्षा कर्डिले यांनी अधिक मताधिक्य घेत वांबोरीपर्यंत पाच हजारांपेक्षा अधिकची मते घेतली. नगर व पाथर्डी भागातील मतदारांनी जवळपास तीस हजारांचे मताधिक्य दिले. त्यामुळे जवळपास ३५ हजारांच्या फरकाने कर्डिले यांचा विजय झाला.
[ हिंदुत्वाचा विजय आहे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्यानेच मी विजयी
हिंदुत्वाचा विजय आहे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्यानेच मी विजयी झालो आहे. यामध्ये तरुण, युवक, ज्येष्ठ तसेच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी यांची मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला संधी मिळाल्याने मी या संधीचे सोनं करत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल.
शिवाजी कर्डिले :नवनिर्वाचित आमदार राहुरी]
[ युवा अक्षय कर्डिलेंच्या डिजेच्या तालात मतमोजणी केंद्रावर
कर्डिलेंनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर कर्डिले समर्थकांनी गुलालाची मुक्त उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच युवा नेते पै. अक्षय कर्डिलेंच्या डिजेच्या तालात भव्य विजयी रॅलीचे मतमोजणी केंद्रावर आगमन झाले. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.]
[ गुहा व गणेगाव मध्ये जल्लोष
शिवाजी कर्डिले यांचा विजय होताच राहुरी मतदारसंघातील गुहा येथील भाजप कार्यकर्त्यांनी कानिफनाथ मंदिरासमोर येत मोठा जल्लोष केला फटाकड्यांचे आतचबाजी करत गुहा ग्रामस्थांनी विजत साजरा केला तर आदर्श गाव गणेगाव येथे युवा नेते व सरपंच अमोल भनगडे तसेच ज्ञानेश्वर कोबरणे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावात डीजेच्या समोर मोठा जल्लोष करत गुलालाची उधळण केली व यावेळी महिलाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या]