Sunday, March 29, 2026

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी संगीता शिंद यांची बिनविरोध निवड

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

नेवासा तालुक्यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 
उपसरपंच पदी सौ.संगीता नामदेव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच  पद हे रोटेशन पद्धती नुसार एक -एक वर्षासाठी ठरविल्यामुळे पंढरीनाथ फुलारी यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
सरपंच सौ.रोहिणी नामदेव निकम यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि. २८ नोव्हेबर रोजी  झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सभेत उपसरपंच पदी सौ.संगीता शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळीग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे,ग्रामपंचायत सदस्या सौ.वैशाली शिंदे,सौ.उषा मिसाळ,सौ.सुहासिनी मिसाळ,सौ.स्वाती वायकर,सौ.माया  गंगावणे,सौ.मंगल गोर्डे,सौ.लताबाई  सोनवणे,पंढरीनाथ फुलारी,अण्णासाहेब गव्हाणे,  दिलीप गोर्डे,दादासाहेब गजरे,दत्तात्रय काळे, अशोकराव मिसाळ,डॉ. शिवाजी शिंदे, गणेश गव्हाणे,नामदेव निकम, वजीर शेख, रामचंद्र गंगावणे, देवेंद्र काळे, संजय गव्हाणे,बाबासाहेब गोर्डे,रामभाऊ देशमुख,विष्णु फुलारी आदी यावेळी उपस्थित होते.
- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!