Thursday, December 12, 2024

खरबदार शिव्या दयाल तर ५०० रुपये दंड करू

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते आता ग्रामसभेने आई व बहीणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतकडून दंडात्मक कारवाई  करण्यात येणार असून शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकरण्यात येईल असे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.

सौंदाळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत, जर शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकरण्यात येईल. शिव्या देताने आईचा व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अंगा संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो. त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई बहिणींना व मुलीला आठवले पाहिजे. कारण शिव्या देणारा व्यक्ती ज्या स्त्रीच्या अंगाचा शिव्या देताना उच्चार करतो तसेच शरीर आपल्या कुटुंबातील महिलेचे असते. शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे असे सरपंच शरद आरगडे यांनी म्हंटले आहे.

*बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा…

यावेळी बालकामगार बंदीचा ठराव घेण्यात आला बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी “बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा” असे स्लोगन  ठरवून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस  दिले जाईल असे ठरले.

सौंदाळा गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे. गावात कुणीही बालविवाह करू नये केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही ग्रामसभेत  ठरले.

सोशल मीडियाच्या मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्याकडे मोबाईल द्यायचा नाही असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.
या सर्व ठरावाची  सुचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली व अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले.
यावेळी  उपसरपंच कोमल आरगडे,  सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे, छाया मिनीनाथ आरगडे, भीमराज आढागळे, सुधीर आरगडे, बाळासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, मंजू आढागळे, माजी सरपंच प्रियंका आरगडे, उषा बोधक, मंगल बोधक, रंजना बोधक, अश्विनी आढागळे, कावेरी आढागळे,ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांच्या सह मोठ्या संख्येने आदी महिलांसह पुरुष हजर होते. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!