Thursday, January 23, 2025

कुकाणा यात्रेत टिंगल-टवाळी,शांतता भंग करणाऱ्यांवर सक्त कारवाई करू-पोनि धनंजय जाधव

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील हजरत सय्यद न्यामत बाबा यात्रा (उरूस) उत्सव काळामध्ये कोणीही डॉल्बी लावून चादर मिरवणूक काढणार नाही तसेच मोटर सायकलचे सायलेन्सर काढून कोणीही वाहने पळवणार नाहीत. या बाबतच्या सक्त सूचना पोलिसांना दिल्या असून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे सुतोवाच पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे. तसेच छेडछाड, रोमिओगिरी, टिंगल-टवाळी करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई करणारे सध्या वेषातील पथक देखील कार्यरत राहणार असल्याचे ही श्री.जाधव यांनी सांगितले.

कुकाणा स्थित हजरत सय्यद न्यामत बाबा दर्गा उत्सव संबंधाने आज मंगळवारी 3 डिसेंबर रोजी धनंजय अ. जाधव पोलीस निरीक्षक नेवासा यांनी यात्रा कमिटीची दर्गा परिसरामध्ये बैठक घेतली.
या बैठकीमध्ये अब्दुल हफिस शेख, अमोल अभंग, वसंतराव देशमुख, भाऊसाहेब कोलते, कारभारी गोरडे, विलास देशमुख, इस्माईल शेख, राम जाधव, दौलत देशमुख, बालमभाई शेख, बाळासाहेब कापरे, एकनाथ कापरे, इनुस बालंदर, अरुण कुमार देशमुख, मुसाभाई इनामदार, इकबाल इनामदार, शकूर शेख, रामदास गोल्हार ईत्यादी उपस्थित होते.

बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांनी मागील अनुभवावरून तक्रारी वजा सूचना मांडल्या. यामध्ये तरवडी चौकात पोलीस राऊटी उभारणे, दर्ग्याच्या पाठीमागे पोलीस पिंजरा उभा करणे, साधे वेषात पोलीस नेमणे, डीजे डॉल्बीला परवानगी देऊ नये. तमाशा कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून मोटर सायकल पळवतात, हगामा बंदोबस्त इत्यादी सूचना मांडल्या. स्थानिक यात्रा कमिटी व नागरिकांनी मांडलेल्या सर्व सूचनेवर तातडीने कारवाई कार्यवाही कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीच्या वेळी कुकाणा दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस नाईक काळोखे, गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अवी वैद्य, रसाळ, फाटक, महिसमाळे इत्यादी हजर होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!