मुंबई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याने लाडक्या बहिनींचा देवाभाऊच महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
आज दि.४ डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार मानले. एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर “मोदी है तो मुमकीन है” हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमडंळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांनी अनुमोदन दिले. यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आलेले विजय रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होताच विधिमंडळात ‘देवाभाऊ’च्या घोषणा देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर राज्यातील भाजपच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत आहे
*महाराष्ट्र विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ…
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2