नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा पतसंस्थेच्या सन २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन रामेश्वर महाराज कंठाळे यांचे हस्ते झाले.
यावेळी बोलतना रामेश्वर महाराज कंठाळे म्हणाले की, संत नागेबाबाच्या नावाचा मोठा महिमा असून या नावाच्या धाकानेच संत नागेबाबा पतसंस्था व मल्टीस्टेटचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी आहे. नागेबाबा परिवार सामाजिक , शैक्षणिक , वैद्यकीय क्षेत्रात समाज हिताचे उल्लेखनीय कार्य करत आहे .संस्था ३६५ दिवस कार्यरत असून संस्थापक कडू भाऊ काळे यांच्या आचार विचारातुन संस्थेची प्रगती उत्तरोत्तर होत आहे . दत्तात्रय काळे,राजेंद्र चिंधे, कारभारी गरड आदींची मनोगत व्यक्त केले.
दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास गणपतराव गव्हाणे , नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव तागड , माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे , अजित रसाळ , गणेश महाराज चौधरी , शिवाजीराव फुलारी,कादरभाई सय्यद , आशोकराव चौरे, कोंडीराम मडके, बाबासाहेब गोर्डे, अजित रसाळ,संजय नवले, शिवाजी फुलारी, राजेंद्र चिंधे,अवधूत लोहकरे, किशोर भणगे,गोरख फुलारी, उमेश मुंडे, सुभाष हुलजुते,जालिंदर देशमुख,मोहन वाघडकर आदिंसह संस्थेचे सर्व कर्मचारी, कर्जदार ,खातेदार , हितचिंतक उपस्थित होते.
दिलदार शेख यांनी प्रास्ताविक केले .
शाखा व्यवस्थापक संतोष साप्ते यांनी आभार मानले.