नेवासा
शनिवार उद्या दि. ७ डिसेंबर रोजी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात इस्रोच्या “स्पेस ऑन व्हील” फिरते प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केले.
विज्ञान भारती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो यांच्याद्वारे स्पेस ऑन व्हील नावाचे हे अनोखे फिरते प्रदर्शन नेवासे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले असून शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना इस्रो द्वारा निर्मित, उपग्रह, प्रक्षेपण याने आणि अन्य साहित्य याच्या प्रतिकृती द्वारे माहिती मिळावी या उद्देशाने ही बस पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात जावी असा विज्ञान भारतीचा प्रयत्न आहे.
दि. ७ डिसेंबर रोजी पूर्ण दिवसभर विद्यार्थी पालक नागरिक या बसच्या मोफत प्रदर्शनाचा लाभ घेतील आणि संध्याकाळी ही बस नगर कडे रवाना होईल.
सहभागी शाळांना मिळणार इस्रोचे प्रमाणपत्र…
संस्थेच्या शाळेच्या विद्यार्थी, पालक यांनी तर या मोफत प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, त्याचबरोबर, परिसरातील अन्य शाळांना देखील आमंत्रित केले जाईल. या उपक्रमात सहभागी शाळा, स्वंयसेवक यांना इस्रो कडून प्रमाणपत्र मिळणार आहे.