नेवासा/सुखदेव फुलारी
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने पुर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली साखर कारखाना मालक प्रतिनिधी , साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढ कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपली होती. दि.१ एप्रिल २०१४ पासून पुढील ५ वर्षाकरिता राज्यातील साखर कामगारांना नवीन वेतनवाढ व सेवाशर्ति लागू करण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठित करावी या मागणी करिता अविनाश आदिक अधिक नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन इंटक तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व कॉ. आनंद वायकर यांचे नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ या राज्यव्यापी संघटनेने शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
तसेच अविनाश आदिक व आमदार भाई जगताप यांच्या पुढाकाराने सहकार मंत्री दिलीप वसे पाटील यांच्या दालनात मंत्रालयामध्ये साखर कामगार प्रतिनिधी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक हे घेण्यात आली होती या बैठकीपूर्वक मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी त्रिपक्ष समिती गठित करू अशा स्वतंत्र देण्यात आले होते मात्र ते आश्वासनेते पूर्तता न झाल्याने राज्यातील काही कामगार संघटनांनी 16 डिसेंबर पासून बेमुद्रा संपावर जाण्याचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सहकार व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी तातडीची बैठक घेतली व त्यामध्ये त्रिपक्षी समिती गठित करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने मंगळवार दि. ९ डिसेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर करून
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्याबाबत साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती स्थापन केली आहे.
राज्य शासनाने गठीत केलेली त्रिपक्षीय समिती अशी…..
साखर कारखाने मालक प्रतिनिधी सदस्य…
१.श्री.पी.आर.पाटील, अध्यक्ष, साखर संघ, साखर भवन, ११ वा मजला, नरीमन पॉईन्ट, मुंबई
२.श्री. संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, साखर संघ, मुंबई.
३.आ.श्री.प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष, साखर संघ, साखर भवन, ११ वा मजला, नरीमन पॉईन्ट, मुंबई.
४.श्री. जयप्रकाश साळुंखे दांडेगांवकर, संचालक, साखर संघ तथा मा. अध्यक्ष, पुर्णा सहकारी साखर कारखाना लि., बसमतनगर, हिंगोली-४३१५१२.
५.श्री. दिलीपराव देशमुख, तज्ञ संचालक, साखर संघ तथा मा. अध्यक्ष, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., विलासनगर, लातूर.
६. श्री. प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे, संचालक साखर संघ तथा मा.माजी अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखाना, हुपरी- यळगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
७.श्री. राजेश टोपे, विशेष निमंत्रित संचालक साखर संघ तथा मा. संचालक, कर्मचोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, ता. अंबड, जि. जालना.
८.श्री.बी.बी.ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा आणि चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि., रांजणी, ता. कळंब, जि.धाराशिव.
९. डॉ. पांडूरंग राऊत, महासचिव, विस्मा आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि., जि.पुणे.
१०.श्री. योगेश पाटील, कार्यकारी संचालक, अथणी शुगर्स लि., जि. कोल्हापूर.
११.डॉ. समय बनसोड, उपाध्यक्ष (साखर), मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि., जि. नागपूर,
१२ श्री.अविनाश जाधव, व्यवस्थापकीय संचालक, सिध्दी शुगर अड अलाईड इंडस्ट्रीज लि.,जि. लातूर.
*साखर कामगार संघटना प्रतिनिधी सदस्य…*
१.श्री. तात्यासाहेब रामचंद्र काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, पुणे.
२.श्री. शंकरराव रामचंद्र भोसले, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, सांगली.
३.श्री.राऊ शंकर पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळं, कोल्हापूर.
४.श्री. अविनाश दामोदर आपटे. कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार अहिल्यानगर. प्रतिनिधी मंडळ,
५.कॉ. आनंदराव वायकर, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, अहिल्यानगर.
६.कॉ.पी.के. मुडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, यवतमाळ.
७.श्री. सत्यवान शिखरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, पुणे.
८.कॉ. शिवाजी औटी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, अहिल्यानगर.
९.आ.अशोक अर्जुनराव ऊर्फ भाई जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन, मुंबई.
१०.श्री.अविनाश गोविंदरावजी आदिक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन (इंटक), श्रीरामपूर, अहिल्यानगर.
११.नितीन बबनराव पवार, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन (इंटक), श्रीरामपूर, अहिल्यानगर,
१२.श्री.डी. डी. वाघचौरे, खजिनदार, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन, गिरगाव, मुंबई.
१३.श्री. युवराज रणवरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, पुणे.
*निमंत्रित सदस्य…*
१.अड. श्री.भूषण महाडीक, ३०१, श्रीजी चेंबर्स, ६० जन्मभूमी मार्ग, ३ रा मजला, फोर्ट, मुंबई- ८०००
*शासनाचे प्रतिनिधी..*
१. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
*सदस्य सचिव..*
श्री. रविराज इळवे,
कल्याण आयुक्त, कामगार कल्याण मंडळ मुंबई यांची त्यांच्या
ही समिती महाराष्ट्रतील साखर कारखान्यांना कामगारांच्या मागण्यांवर विचार करुन समिती स्थापन झाल्याच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीत शिफारशीसह शासनास अहवाल सादर करणार आहे.