माय महाराष्ट्र न्यूज:कोरोमंडेल ई.ली. चे सल्फामॅक्स* वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य इलिमेंटल सल्फर (जे आपण बाजारातुन सल्फर आणतो तेच) हे पिक तोपर्यंत शोषुन घेवु शकत नाही जोवर त्याचे रुपांतर सल्फेट (SO4) स्वरुपात होत नाही, आणि हे होण्यासाठी जमिनीत सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया असणे गरजेचे आहे. सल्फेट हे ऋण भार असलेले मुलद्रव्य असल्या कारणाने ते जमिनीत लवकर नत्रा पेक्षा ५० टक्के जास्त वेगाने वाहुन जाते.
*सल्फर चे कार्य-*
१.प्रथिने आणि पेप्टाईड चा एक अविभाज्य घटक
२.नत्राचे (इनऑरगॅनिक नत्र) रुपांतर प्रथिनांत करण्यासाठी उपयुक्त
३.हरितलवक निर्मितीत संप्रेरक म्हणुन कार्य करते.
४.कांदा पीक मध्ये सदृढ व निरोगी पांढऱ्या मुळींची वाढ करते
५.कांदा पिकांमध्ये साठवण क्षमता वाढविते
६.ज्या रसायनांमुळे कांदा, मोहरी आणि लसणास वास आणि विशिष्ट चव येते त्या रसायनांचा घटक.
७.पिकाच्या खराब झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी गरजेचे अन्नद्रव्य
८.जमिनीचा सामु कमी करण्यासाठी
९.कांदा पिकांमध्ये पतींची संख्या वाढविण्यासाठी
*वापरण्याचे प्रमाण :* २५ किलो प्रति एकर
लेखक: जयेश पाटील, कृषि शास्त्रज्ञ, कोरोमंडेल ई. ली. ९६९९७३४९४५, ८००७७५६४३९