नेवासा
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील आमदार विठ्ठलराव लंघे यांचे बंधू प्रगतशिल शेतकरी सुनिल वकिलराव लंघे यांचे कन्नड तालुक्यातील जावई रोहित खरे यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती झाली आहे.
सुनिल लंघे हे उच्च शिक्षित असून त्यांनी आपल्या शेतीत नेहमी वेगवेगळे प्रयोग करून समाजाला दिशा दर्शक काम केले आहे . त्यांनी प्रापंचिक जीवनात एकाच मुलीवर थांबवून समाजामध्ये मुलगा आणि मुलगी असा कोणताही भेदभाव बाळगू नका असा संदेश दिला आहे .
त्यांचीच एकूलती एक मूलगी ऐश्वर्या सुनिल लंघे हिचा विवाह काही दिवसांपूर्वी कन्नड तालुक्यातील भोकनगाव या छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबातील पुत्र रोहित रमेश खरे यांच्याशी झालेला आहे .
भारतीय सैन्यातील तोफखाना विभागातील रोहित खरे यांनी कर्नल पदावर बढ़ती मिळवून कन्नड तालुक्याचा नाव लौकिक वाढवला आहे.
त्यांचे बढतीबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा.संदिपान भुमरे, आमदार विठ्ठलराव लंघे, आ.संजना जाधव, गणपतराव खरे, सुनिल लंघे, आ . उदयसिंग राजपूत ,आ.नामदेव पवार , ऐश्वर्या खरे यांनी अभिनंदन केले आहे .