नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाला केंद्रीय सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तथा राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे (एनसीडीसी) व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार बंसल यांनी ज्ञानेश्वर उद्योग समुहाला भेट देऊन सहकाराच्या माध्यमातून झालेल्या सामाजिक-आर्थिक विकासाची (socioeconomic development) नोंद घेतली.
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अधीन असलेल्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी) मार्फत सहकार क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, आधुनिकीकरणाला प्रोत्साहन देणे, सहकाराचे फायदे तळागाळात पोहोचविणे,कृषी उत्पादनाकरिता वित्तपुरवठा करणे हे या एनसीडीसीचे मुख्य उद्देश आहेत. अशा या एनसीडीसीचे
कार्यकारी संचालक श्री.बंसल यांनी दि.१२ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. एनसीडीसीचे पुणे विभागीय संचालक
कर्नल विनीत नारायण हे त्यांच्या सोबत होते.कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
श्री.बंसल यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ५० वर्षापासून सहकार क्षेत्रात चांगले काम करीत आहेत त्या माध्यमातून परिसरात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तर कसा उंचावला याची पहाणी केली.
*ज्ञानेश्वर साखरे साखर कारखान्याने प्रगती करत १२५० मेट्रिक टनावरून प्रतिदिन ९००० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता वाढ, केंद्र सरकारच्या धोरणाला प्रतिसाद देत सहविज निर्मिती प्रकल्प व इथेनॉल निर्मिर्ती प्रकल्प कार्यान्वित केले,शेतकऱ्यांना वैयक्तिक उपसा सिंचन योजने करिता पाणी परवाने मिळवून देऊन पाईप लाईन करिता बैंक कर्ज उपलब्ध करून दिले.त्यामुळे हजारो एकर जमीन ओलिता खाली आली. शेती आणि रोजगार याच्या माध्यमातून शेतकरी-कामगारांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक जीवनमान उंचावले. कामगारांना हक्काचे घर देणारी गृहनिर्माण संस्था, महिला संस्था निर्माण केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणा बरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कृषि विद्यालय, नर्सिंग कोर्सेस सूरु केले. शेतकऱ्यांचे कृषि उत्पन्न वाढीकरिता कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण व कृषि सल्ला देण्याचे काम केले जात आहे.या सर्व सामाजिक-आर्थिक विकासाची नोंद घेतली.साखर कारखान्यातून होणारी साखर निर्मिर्ती, सी-हेवी व बी-हेव्ही मोलासेस, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मिती प्रकल्प, इहॅपोरेशन प्रकल्प, इंसनरेशन बॉयलर आदी प्रकल्पाची पाहणी केली.*
कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील व कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी त्यांना माहिती दिली.
कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे,काशिनाथ नवले,काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, तांत्रिक सल्लागार एम.एस.मुरकुटे,एस.डी. चौधरी,एम.जी.पवार, मुख्य अभियंता आर.एस.पाटील,प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के आदि यावेळी उपस्थित होते.