Thursday, January 23, 2025

डॉ.हेडगेवार पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा येथील डॉ.हेडगेवार पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर जिल्हा सरसंघचालक किशोर अण्णा निर्मळ यांच्या हस्ते व नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते व दैनिक राष्ट्र सहयाद्रीचे संपादक करण नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
       
  यावेळी झालेल्या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन सुरेशराव नळकांडे,व्हाईस चेअरमन मीनाताई परदेशी,संचालक अरविंद मापारी,पत्रकार शाम मापारी, इंजिनियर सुनीलराव वाघ,अँड.संजीव शिंदे,डॉ. प्रणव जोशी, समाजकल्याण विभागाचे माजी सभापती राजेंद्र वाघमारे, भाजपचे शहर उपाध्यक्ष राजेश कडू, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अमृता नळकांडे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेवासा तालुका कार्यवाह सूनील सावंत, सहकार्यवाह प्रशांत मापारी,संचालक सुभाष कुलकर्णी, कैलास करंडे,विनोद नळकांडे,गणेश परदेशी, अशोक ताके,अनिल ताके,श्रीकांत नळकांडे, संस्थेच्या मॅनेजर सौ. कावेरी नाबादे, राम सचदे, प्रशांत बहिरट, मनोज देव श्रीमती नंदा नळकांडे उपस्थित होते.
          
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सुरेशराव नळकांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.पतसंस्था स्थापन होऊन दोन तप उलटले असून २५ व्या वर्षात पदार्पण केले असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पतसंस्थेने यशस्वीपणे वाटचाल सुरू केली असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.संचालक पत्रकार शाम मापारी यांनी पतसंसंस्थेचा यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा आपल्या भाषणातून विषद केला.
        
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर जिल्हा सरसंघचालक किशोर अण्णा निर्मळ,आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,जेष्ठ पत्रकार करणजी नवले,युवा नेते अनिल ताके यांनी डॉ. हेडगेवार पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.डॉ.प्रणव जोशी यांनी राष्ट्र भक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
    उपस्थित मान्यवरांच्या हस्ते २०२५ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ प्रणव जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
     

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!