नेवासा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या संकल्पनेतून कुकाणा येथे जनता दरबार संपन्न झाला. या जनता दरबारात तीन हजाराहून अधिक महिला व पुरुषांनी सहभाग घेतला.
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील साईश्रद्धा मंगल कार्यालयात रविवार दि. 29 डिसेंबर रोजी जनता दरबार संपन्न झाला.माजी आमदार पांडुरंग अभंग कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने सुरुवात करण्यात आली.जनता दरबारामध्ये आलेल्या महिला व पुरुषांची विविध प्रश्नांची अब्दुल भैया शेख यांनी सोडवणूक केली. त्यामध्ये रेशन कार्ड लाडक्या बहिणीचे प्रश्न डोला विषयी माहिती आरोग्य विषयी माहिती तसेच अपंग व्यक्तीसाठी विविध योजना नवीन मतदार नोंदणीसाठी आधार अपडेट सबलीकरणासाठी पिंक रिक्षा योजना, बांधकाम मधुर कामगार योजनेसाठी तसेच बचत गटासाठी अशा विविध शासकीय योजनेची माहिती तसेच त्याची सोडवणूक अब्दुल भैया शेख यांनी या जनता दरबाराच्या माध्यमातून केली.
यावेळी बोलताना अब्दुलभैया शेख म्हणाले की, मला सर्व पक्षाची नेतेमंडळी सपोर्ट करतात व चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप शिवसेनाची लोक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे व सर्वांचे स्वागत करत अनेक प्रश्नांची सोडवणूक करत सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे, उत्तर महाराष्ट्र कामगार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद राजहंस यांनी आपले मनोगत व्यक्त करत जनता दरबारात शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब कार्यक्रमाची गर्दी पाहून व अब्दुल भैय्या यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी स्वतः मोठ्या मनाने येऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास माजी सरपंच एकनाथ कावरे, सतीश गोडसे, अभिराज आरगडे, कैलास महाराज रिंधे, सद्दाम पटेल आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
जमाल भाई शेख व इम्तियाज शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
पुरुषोत्तम चिंधे यांनी प्रास्ताविक केले .अभिराज आरगडे यांनी आभार मानले.