नेवासा
नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी नेवासा तालुका बहुउद्देशीय प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष बापुसाहेब भागवत यांनी दिली.
नेवासा तालुक्यात १ जानेवरी पासून सलुन दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी भेंडा येथे आयोजित बैठकीत नाभिक समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना श्री.भागवत बोलत होते.नगर उत्तर उपाध्यक्ष नंदू औटी, तालुका अध्यक्ष संदिप ताकपेरे, उपाध्यक्ष सचिन वाघमारे, तालुका युवा अध्यक्ष वामन औटी,दिलीप शिंदे,दत्तात्रय शिंदे व्यासपीठवर उपस्थित होते.
श्री.भागवत पुढे म्हणाले की,
नेवासा तालुका बहुउद्देशीय प्रतिष्ठान स्थापन करून त्या माध्यमातून तालुक्यातील सर्व समाज बांधव एकत्रीकरण करणार आहोत. यामुळे समाजातील विविध अडीअडचणी,समाज जागृती, विद्यार्थी मार्गदर्शन, व्यावसायिक प्रशिक्षण,सह समाजासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी एक व्यासपिठ उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र राज्य सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनने संपुर्ण महाराष्ट्रात २० ते ३०टक्के सलुन दरवाढ जाहिर केली ती योग्यच आहे. नेवासा तालुक्यात पाच वर्षा पुर्वी २०२० मधे दर वाढ झाली होती. तद्नंतर महागाई वाढली,सलुन ब्युटी पार्लर साहित्य दर ही वाढले, आमचे दर मात्र वाढले नाही. विज बिल, दुकान भाडे,सलुन पार्लर साहित्य,ईतर टॅक्स, शैक्षणीक फी, जिवनावश्यक वस्तुंचे दर वाढल्याने दर वाढ करण्याशिवाय गत्यंतरच नसल्याने १ जानेवारी पासुन सलून दरात २० टक्के दरवाढ करत आहोत. उपस्थीतांनी टाळ्या वाजवून दरवाढीला प्रतीसाद दिला.
यावेळी घोडेगाव ,चांदा, कुकाणा,सोनई, नेवासा ,नेवासाफाटा, वडाळा, प्रवरासंगम,देवगाव येथील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.