नेवासा
श्रीक्षेत्र भेंडा येथील फुलारी वस्तिवर बांधण्यात येत असलेल्या श्रीसंत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ रविवार दि.२९ डिसेंबर रोजी करण्यात आला.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे भेंडा-जेऊर रोडवरील फुलारी वस्तीवर २१ लाख रुपये ख़र्चन बांधण्यात येणाऱ्या श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर बांधकामाचे भूमीपुजन दि.११ डिसेंबर रोजी वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, संत शिरोमणी सावता महाराज यांचे १६ वे वंशज रमेश महाराज वसेकर यांचे यांचे शुभहस्ते व आमदार विठ्ठलराव लंघे कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली झाले होते.श्रीक्षेत्र अरण येथील विहिरीतील पाणी टाकून तयार केलेल्या पहिल्या पाच काँक्रीट पाट्यांचे पूजन करून दि.२९ रोजी पायाभरणीचा करून मंदिर उभरणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र गोंडेगाव येथील रेणुका माता व शैनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब महाराज रोडगे,उपाध्यक्ष अण्णासाहेब वाघुले, गणपतराव गव्हाणे, कारभारी गरड,ज्ञानदेव गरड, विष्णू गरड,
डॉ.रजनीकांत पुंड,देवेंद्र काळे,शिवाजी फुलारी,संदीप जावळे,ज्ञानदेव पुंड,शरद फुलारी, बाळासाहेब फुलारी,संदीप फुलारी, संभाजी सोनवणे यांचेसह संत शिरोमणी सावता महाराज सेवा मंडळातील सदस्य हजर होते.