Tuesday, April 22, 2025

नेवासा तालुक्यात अनधिकृत गौणखनिज वहातुक करणारे दोन डंपर पकडले

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यात अनधिकृत गौणखनिज उपसा व वाहतूकच्या विरोधात ‘मंडळअधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसात  दोन ठिकाणी कारवाई करत मुद्देमालसह २ डंपर जप्त केले. विशेष म्हणजे या दोन्हीही कारवाई करणारया तीन मंडळअधिकारी  या महिला अधिकारी आहेत.
           
  जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ, नेवासा विभागाचे प्रांतधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा खुर्द, घोडेगाव, सोनई, कुकाणा, सलाबतपूर, भानसहिवरे,  देडगाव, प्रवरासंगम, वडाळा बहिरोबा या गावासह सर्वच मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैध गौणखनिज उपसा वाहतूक विरोधात नेवासा तालुक्यात मोहीम उघडली आहे.
          
या पथकाने अनाधिकृत गौण खनिज उपसा व वाहतुकीच्या विरोधात पहिली कारवाई मंगळवार दि. २४ रोजी सायंकाळी खडका फाटा परिसरात केली असून त्यात ४ ब्रास मुरूमासह एक वाहन ताब्यात घेतले आहे. तर दुसरी कारवाई दि. २५ रोजी उस्थळदुमाला हद्दीत करत त्यात २ ब्रास मुरूमसह वाहन जप्त केले आहे. हि दोन्ही वाहने पथकाने ताब्यात घेत तहसीलदार निवास परिसरात जमा करण्यात आली आहे.
           या दोन्हीही कारवाई महिला मंडळ अधिकारी तृप्ती साळवे (कुकाणा मंडळ), सरिता मुंडे (भानसहिवरे मंडळ) व संगीता पुंड (सलाबतपूर मंडळ) यांनी केल्या. पथकातील सर्व सदस्यांचे त्यांना सहकार्य लाभले आहे.

“मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने दोन वाहनांवर कारवाई केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधात महसूल विभागाची कारवाईत सातत्य ठेवणार असून मोहीम आणखी तीव्र करणार  आहोत.
-डॉ.संजय बिरादार (तहसीलदार,नेवासा)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!