Sunday, December 29, 2024

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्तकरण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला  दिले आहेत.

 बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. अनेक दिवस उलटून देखील देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये दि.28 सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक आणि मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी केली. दरम्यान, आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. 

बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत.

*बंदूक परवाने रद्द करण्याची प्रक्रिया करा…

बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!