Sunday, December 29, 2024

श्रीमोहटादेवी संस्थान;सातवा वेतन आयोगा बरोबरच पंढरपूर भक्त निवासाकरिता जमीन खरेदीचा निर्णय

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

पाथर्डी

पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवी संस्थानने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्या बरोबरच पंढरपूर येथे भक्त निवासाकरिता जमीन खरेदीचा निर्णय घेतला आहे.

श्री मोहटादेवी संस्थानच्या मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबद औद्योगिक न्यायालयात दाखल न्यायालयीन तक्रार व इतर बाबी लक्षात घेता श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे या न्यासाद्वारे २ पदसिद्ध विश्वस्त, २ स्थानिक विश्वस्त, २ बाहेरील विश्वस्त, २ कर्मचारी प्रतिनिधी व १ लेखापरीक्षक (स्वतंत्र सदस्य) अशी समिती स्थापन करण्यात आली होती.
सदर समितीने आपला अहवाल सक्षम प्राधिकारी यांना सादर केला व सदर अहवालाचे दि. २५.१२.२०२४ रोजीच्या श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे या न्यासाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत अभ्यासपूर्ण व विश्लेषणात्मक सादरीकरण सादर केले.
सदर बैठकीस न्यासाचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर न्या. महेश लोणे, विश्वस्त शशिकांत दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, श्रीराम परतानी, ऍड. कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, ऍड. विक्रम वाडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुरेश भणगे हे उपस्थित होते.
सदर समितीच्या अहवाल लेखनासह सादरीकरणाची जबाबदारी स्थानिक विश्वस्त श्री. विठ्ठल कुटे व श्री. अक्षय गोसावी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने पार पाडली. तसेच कर्मचारी प्रतिनिधी तथा समिती सदस्य म्हणून श्री. शहादेव पालवे व श्री. मारुती दहिफळे यांनी कामकाज पाहिले.
समितीच्या अभ्यासपूर्ण अहवालाचे अवलोकन व समग्र चर्चेअंती विश्वस्त मंडळाद्वारे (अ) सर्व मानधन कर्मचाऱ्यांना सेवक या पदाची वेतनश्रेणी लागू करणे (ब) सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी रु १,२१,०००/- देणे (क) सर्व कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचे लाभ लागू करणे असा कल्याणकारी निर्णय घेण्यात आला.
सदर निर्णयामुळे श्री मोहटादेवी संस्थानच्या सर्वच कर्मचाऱ्यांना भावना आवरता आल्या नाहीत व त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या तोंडात पेढा भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या व जनसंपर्क अधिकारी व लेखापाल यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
सदर समितीस चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश अहमदनगर न्या. महेश लोणे, माजी चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश न्या. निरंजन नाईकवाडी, पदसिद्ध विश्वस्त तथा दिवाणी न्यायाधीश पाथर्डी न्या. मयुर पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
श्रीमोहटादेवी संस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संघर्षाला न्याय मिळाल्याची व श्रीमोहटादेवी आमच्या नवसाला पावली असून लवकरच नवसपूर्ती करणार असल्याची भावना व्यक्त करून विश्वस्त मंडळाचे आभार मानले.

तसेच विश्वस्त तथा जेष्ठ विधिज्ञ अड. कल्याण बडे यांच्या सुचनेनुसार श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्रीमोहटादेवी ते पंढरपूर पायी दिंडी करिता व भक्तांच्या सुविधेकरिता १ एकर जमिनक्षेत्र खरेदी करण्याबाबत प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात येऊन याप्रकरणी पदसिद्ध विश्वस्त तथा उपवनसंरक्षक श्री. धर्मवीर सालविठ्ठल यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!