नेवासा
राजकीय प्रवासात सतत संघर्ष वाट्याला आला असला तरी चुकीचे पाऊल पडू दिले नाही. खडतर वाटचालीतून जनतेने आमदारकी दिली, त्यामुळे डोक्यात हवा जावू देणार नाही. राजकारण निवडणुकीत झाले, आता विकासासाठी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील जेऊर हैबत्ती येथील रेवन्नाथ कडूभाऊ कानडे यांची येरवडा कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी पदी तर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातील सुरेश विठ्ठल कानडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने या दोन्ही चुलत बंधूचा जेऊर हैबती ग्रामस्थाच्या वतीने गुरुवारी प्राथमिक शाळेच्या आवारात आमदार लंघे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आ.लंघे बोलत होते.
ज्ञानेश्वर तांबे महाराज,डॉ.बाळासाहेब कोलते,प्रताप चिंधे,अंकुश काळे,मुसा इनामदार,दिगम्बर रिंधे, अजय रिंधे,अशोक मिसाळ, महेश उगले,
माजी सरपंच प्रल्हाद रिंधे,सरपंच महेश म्हस्के, अशोक खराडे, माजी सरपंच रामदास खराडे, शरद शिंदे, शरद जाधव,गोरक्ष कानडे,पोलीस पाटील मीनाक्षी रिंधे, साहित्यिक सुभाष सोनवणे, प्रा.शिवाजीराव कानडे, गणेश शेटे आदी यावेळी उपस्थित होते.
आ.लंघे पुढे म्हणाले की, जनतेच्या अपेक्षांची जाणीव ठेवत भविष्यात विकास कामे करणार असून स्व. वकीलराव लंघे यांच्या विचारांच्या शिदोरीवर वाटचाल करत आहे. जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत जिप सदस्य डॉ तेजश्री लंघे यांच्या पाठपुराव्याने उभी राहिल्याचे त्यांनी सांगितलं. माझा आभार दौरा जनतेच्या समस्या समजावून घेण्यासाठी असणार आहे. कानडे बंधुच्या खडतर परिस्थितीत मिळवलेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले.
तुरुंगाधिकारी रेवन्नाथ कानडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा.नानासाहेब खराडे यांनी सूत्रसंचालन केले.