Wednesday, December 17, 2025

नेवासा शहरामधील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या छापा;१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा शहरामधील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची छापा टाकून ९ आरोपीतां विरूध्द गुन्हा दाखल करून १३ लाख ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यबाबद अधिक माहिती अशी की , पोलीस अधिक्षकराकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध व्यावसाविकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्या आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, वापुसाहेब फोलाणे, गणेश भिगारदे, शानेश्वर शिंदे, संतोष लोडे, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, रविंद्र घुंगासे, रमीजराजा आत्तार, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले होते.
दि. ०२ जानेवारी २०२५ रोजी पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शेंडे गल्ली भरावाजवळ काटवनात, नेवासा येथे नदीम सत्तार चौकरी व इतर इसमांनी गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने डांबुन ठेवलेले आहेत. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता काटवनामध्ये गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याचे दिसून आले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना येताना पाहुन संशयीत इसम पळून गेले. आसपासचे नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांची नावे नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबु शाहाबुद्दीन चौधरी,मोजी अबु चौचरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी व अकील जाफर चौधरी सर्व रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले.

पथकाने घटना ठिकाणावरून १३ लाख ४० हजार रूपये किंमतीचा त्यात १७ गायी, ६ गोवंशीय कालवडी व ४ गोवंशीय गोरहे असा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील नमूद ०९ आरोपी विरूध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ०७/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५ (अ), ९ सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबमरे,शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!