Monday, May 12, 2025

नेवासा पोलीसांची कारवाई;जबरी चोरटा सिताफिने जेरबंद

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा पोलिस पथकातील अधीकारी व कर्मचारी यांनी त्याचा सुमारे २ कि. मी. पळत पाठलाग करून चोरटयाला सिताफीने जेरबंद केले.

यबाबद अधिक माहिती अशी की, दि. ०६/११/२०२४ रोजी रात्री १०:१५ वाजता कराड अमृततुल्यजवळ, अहिल्यानगर ते छ. संभाजीनगर जाणारे रोडवर, उस्थळ दुमला शिवार ता. नेवासा येथे फिर्यादी नामे अरुण बापुसाहेब वाघ रा. नारायणवाडी ता. नेवासा यांचे मोटार सायकलला दोन अनोळखी इसमांनी मोटार सायकल आडवी लावुन त्यांना धमकावुन एकाने त्यांचे हात धरुन दुस-याने त्यांचे, खिशात असलेला विवो कंपनीचा मोबाईल व पाचशे रुपये बळजबरीने काढुन घेवुन छ. संभाजीनगरकडे पळुन गेले बाबत नेवासा पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे अचुक तांत्रीक विश्लेषणाचे आधारे नमुद गुन्हा हा गणेश अण्णासाहेब बनसोडे व एक विधी संघर्षीत बालक दोघे रा. भिवधानोरा ता. गंगापुर जिल्हा संभाजीनगर यांनी केल्याचे निष्पन्न झाले. नमुद गुन्ह्यातील आरोपी गणेश अण्णासाहेब बनसोडे याचा भिवधानोरा ता. गंगापुर याची माहीती घेतली असता तो छ. संभाजीनगर व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यातुन एक वर्षाकरीता हद्दपार केले असलेबाबत माहीती मिळाली. त्यानंतर दि. २५/१२/२०२४ रोजी सायंकाळी गणेश बनसोडे हा राहते घरी आला असलेबाबत पो. नि. धनंजय जाधव यांना गोपणीय बातमीदार यांनी माहीती दिल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक करणे करीता पोसई मनोज अहीरे, पोहेकॉ शहाजी आंधळे व पोकों वासुदेव डमाळे असे पथकासह आरोपी गणेश बनसोडे याचे घरासमोर गेले असता पोलीसांना पाहुन गणेश बनसोडे हा घराचे पाठीमागील शेतात जोरात पळुन जाऊ लागला. पथकातील अधीकारी व कर्मचारी यांनी त्याचा सिताफीने सुमारे २ कि. मी. पळत पाठलाग केला असता आरोपी हा शेतातील उंच वाढलेल्या गिन्नी गवतात लपुन बसला. त्याचा तपास पथकाने बारकाईने गिन्नी गवतातुन शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन गंगापुर पोलीस स्टेशनला आणले. तेथे त्याचेवर हद्दपार कालावधीमध्ये परवानगीशिवाय छ. संभाजीनगर जिल्ह्याचे हद्दीत प्रवेश केला म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस अटक केल्यानंतर त्याचा आधी एम.सी.आर. घेवुन तालुका दंडाधीकारी, नेवासा यांचे समक्ष ओळख परेड घेतली असता फिर्यादी अरुण वाघ यांनी त्यास दोन वेळेस तात्काळ अचुक ओळखले आहे. आरोपीकडे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असताना त्याचेकडे कौशल्याने विचारपुस करुन नमुद गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल हा जप्त केला आहे. दि. ०३/०१/२०२५ रोजी अटक आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड संपत असल्याने त्यास न्यायालयात हजर करुन पुढील तपास चालु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे, उपविभागीय पोलीस अधीकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे सुचने प्रमाणे पोसई मनोज अहीरे, पोहेकॉ शहाजी आंधळे, पोहेकॉ संतोष राठोड व पोकॉ वासुदेव डमाळे व उत्तर मोबाईल सेलचे पोना सचिन धनड यांनी धडाडीने कारवाई केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!