नेवासा
नेवासा खुर्द येथील गंगानगर परिसरामध्ये नाईलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमावर नेवासा पोलिसांनी कारवाई करून ८०० रुपये किंमतीचा नाईलॉन मांजा जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
यबाबद नेवासा पोलीस स्टेशनचे पोकॉ अमोल रामनाथ साळवे यांनी सरकारतर्फे फिर्यादी दिली की, दि. १४/०१/२०२५ रोजी सकाळी ११:०५ वाजेचे सुमारास पोलीस नाईक गांगुर्डे, पोकॉ नारायण डमाळे, पोकॉ आप्पा तांबे, पोकॉ अवि वैदय व मी असे पोलीस स्टेशनला हजर असताना पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन यांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलावुन कळविले की, आत्ताच गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे नेवासा खुर्द येथील गंगानगर परिसरामध्ये उषा टॉकीज चौकामध्ये एक इसम हा नाईलॉन मांजा विक्री करत आहे आत्ता गेलास मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाली आहे. त्यावरुन सदर ठिकाणी छापा टाकुन योग्य ती कायदेशीर कारवाई करा असा आदेश दिल्याने लागलीच पोना गांगुर्डे यांनी दोन लायक पंचाना पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेवुन त्यांना बातमीचा आशय समजावून सांगुन छापा घालणे कामी हजर राहुन पंचनामा लिहुन देणेस कळविले त्यास पंचानी होकार दर्शविला वरुन आम्ही व पंच असे खाजगी वाहनाने नमुद ठिकाणी ११:३० वाजता खात्री करुन छापा टाकला असता एक इसम गंगानगर परिसरात मध्ये उषा टॉकीजचे समोरील डाबरी रोडच्या बाजुला मांजा विक्री करत असताना दिसला.
सदर इसमास जागीच पकडुन त्यास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव विजय बाळासाहेब बडे (वय २२ वर्षे) रा. गंगानगर नेवासा खुर्द ता. नेवासा जि अहिल्यानगर असे सांगितले. त्यास आम्हा पोलीसांची व पंचाची ओळख करुन देवुन झडतीचा उददेश समजावून सांगुन आम्हा पोलीसांची व पंचाची अंगझडती देवून सदर इसमाकडील कापडी पिशवीची झडती घेतली असता ५०० रुपये किमतीचे महेंदी रंगाचा नायलॉन नायलॉन मांजा गुंडाळलेली ०१ प्लॉस्टीक रिळ व
३०० रुपये किंमतीचे काळपट रंगाचा नायलॉन मांजा गुंडाळलेली ०१ लाकडी रिळ असा एकूण ८०० रुपये किमतीचा
नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उददेशाने मिळुन आला. दोन पंचा समक्ष मुद्देमाल जप्त करुन व आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आलो आहे.
प्लास्टीक किंवा पक्या धांग्या पासुन बनविलेल्या नायलॉन मांज्याचे विक्रीमुळे पश्यांना, प्राण्यांना व मानवी जिवितास तीव्र इजा होवुन अपघात घडणे किंवा जिवित हानी होवु शकते हे माहिती असताना देखील त्यांने महाराष्ट्र शासन निर्णय CRT २०१५/ CR३७ TC२ दि। १८/६/२०१६ अन्वये काढलेल्या निर्देशाचे अवज्ञा करुन इतरांचे जिविताची सुरक्षा धोक्यात आणण्याची कृती करुन नायलॉन मांज्यांचे विक्री करण्यांचे उददेशांने स्वतः कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे. सदर नायलॉन मांजा विक्रेत्या विरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३,१२५ सह पर्यावरण सरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अवि वैद्य, नारायण डमाळे, अमोल साळवे व भारत बोडके यांनी सिताफिने केले.
*पोलिसांचे आवाहन…
नायलॉन मांजामुळे मागील चार दिवसात राज्यात गंभीर जखमी होण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पारधे हे देखील काल मांज्यामुळे गंभीर जखमी झालेले आहेत.बेकायदेशीर मांजाचा साठा कोणी केला असेल, विकत असेल तर पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले आहे.