Saturday, April 26, 2025

गोंडेगावच्या उपसरपंचाचे सदस्यत्व अपात्रतेला अंतरिम स्थगिती

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील उपसरपंचाने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्रतेच्या आदेशाला अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.

गोंडेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच संताराम खंडू रोडगे हे २१ ते २५ या कालावधीसाठी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून इतरमागास प्रवर्ग या राखीव जागे मधून सदस्य म्हणून निवडून आले होते. परंतु रोडगे यांनी शासकीय गट नंबर ४६ मध्ये अतिक्रमण करून १४ बाय ३९ या मापाचे वीट सिमेंट पत्र्याचे पक्के बांधकाम केले केले असून ग्रामपंचायत नमुना नं. ८ ला मालक सदरी ग्रामपंचायत गोंडेगाव तसेच भोगावटदार संताराम खंडू रोडगे असे नमुद असल्याने त्यांच्या विरोधात बहिरनाथ काशिनाथ वाघुले रा.गोंडेगाव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे संताराम खंडू रोडगे यांना सदस्य पदावरून अपात्र करण्यासाठी विवाद अर्ज दाखल केला होता . या सुनावणी दरम्यान गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांचा स्थळ निरीक्षण अहवाल तसेच अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद तसेच कागदोपत्री आलेल्या पुराव्याच्या आधारे संताराम खंडू रोडगे यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांनी २ डिसेंबर २०२४ रोजी दिला होता.

१३ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ अन्वये दिलेल्या अंतरिम अंतरिम आदेशात नाशिक विभागाचे अपर
विभागीय आयुक्तांनी म्हंटले आहे की,
अपिलाबी श्री. संतराम खंडु रोडगे, रा. गोडेगांव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचेकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र. ९४/२०२३ मधील दि.०२/१२/२०२४ रोजीचे आदेशा विरुध्द या न्यायालयात अपील व स्थगितीअर्ज दिनांक १६/१२/२०२४ रोजी दाखल केलेला आहे.दि.१३/०१/२०२५ रोजी अपीलार्थी यांचे यतीने त्यांचे विधीज्ञ यांनी स्थगिती अर्जावर तोंडी युक्तीवाद केला. सदर युक्तीवादात अपीलार्थी यांचे वडील खंडू लक्ष्मण रोडगे व आई केशरबाई खंडु रोजगे यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत आगपंबायतीने मिळकत नं. १३ मध्ये सन २०१२-२०१३ मध्ये घरकुलाचे बांधकाम करून दिलेले आहे. सदर मिळकतीचे लगत ग्रामपंचायत मिळकत नंबर २६९ हि अपीलार्थी यांचे भाऊ संभाजी खंडु रोडगे यांचे ताब्यात आहे व संभाजी खंडु रोडगे कुटुंबीयासह तेथे राहत आहे. अपीलार्थी हे वादातील ग्रामपंचायत मिळकत नंबर २६९ मध्ये राहत नाहीत. ती अपीलार्थी याचे कब्जात नाही,तिचा उपभोग घेत नाहीत, त्यामुळे सदर मिळकतीस अपीलार्थी यांनी अतिक्रमण केले असे म्हणता येणार नाही. त्यामुळे यथायोग्य न्याय मिळालेला नसल्याने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील दि.०२/१२/२०२४ रोजीचे आदेशास स्थगिती देण्यात यावी असा तोंडी युक्तीवाद केला.सुनावणी कामकाज पूर्ण करून कनिष्ठ न्यायालयाची मुळसंचिका व उभय पक्षकारांचे सविस्तर युक्तीवादाचे आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल. सबब अपीलार्थी यांची स्थगिती मिळणे बाबतची विनंती मान्य करण्यात येत आहे. तरी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील दि.०२/१२/२०२४ रोजीचे आव्हानित आदेशास पुढील आदेशा पावेतो स्थगिती देण्यात येते. या प्रकरणी पुढील सुनावणी दिनांक २९/०१/२०२५ सेभिसकाळी ११ वाजता होईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!