नेवासा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या गुरुवार दि. 16 जानेवारी 2025 रोजी स. 10 वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात
येणार आहे.
जनतेच्या समस्यांचे निराकरण व्हावे जिल्ह्यातील फायनान्स कंपन्याकडून होणारी ग्राहकांची पिळवणूक, व फसवणूक, युवा प्रशिक्षण योजना सहभागी विध्यार्थी यांच्या भवितव्याचा विचार, संजय गांधी निराधार योजना अडचणी, स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारी आदी मागण्यासाठी हा मोर्चा नेला जाणार असल्याचे श्री.शेख यांनी सांगितले.
या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेवासे तालुक्याध्यक्ष अभिजित आरगडे व नगर राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण असंघटित कामगार संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष इम्तियाज शेख यांनी केले आहे.