Thursday, November 27, 2025

प्रहारच्या नगर उत्तर जिल्हा प्रमुखपदी ज्ञानेश्वर सांगळे तर युवक जिल्हा प्रमुखपदी पांडुरंग औताडे

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रहार जनशक्ति पक्षाचे अहिल्यानगर उत्तर जिल्हा प्रमुख पदी ज्ञानेश्वर सर्जेराव सांगळे तर युवक जिल्हा प्रमुख पदी पांडुरंग केशव औताडे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचे आदेशाने प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सर्जेराव सांगळे तसेच युवक जिल्हा प्रमुख पदी विधीज्ञ पांडुरंग केशव औताडे यांची निवड निश्चित करून त्यांना नियुक्ति पत्र दिले.
यावेळी बोलताना नूतन जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व पांडुरंग औताडे यांनी सांगितले की, दि. १३ जानेवारी अखेर असलेली जुनी जिल्हा कार्यकारणी व सर्व तालुका युवक कार्यकारणी बरखास्त करण्यात येत असून नूतन कार्यकारिणीची लवकरच सर्वांनुमते निवड करण्यात येईल.
राष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढूस यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने काम करतील व एक दिलाने संघटना वाढवतील असे आश्वासन देऊन आभार व्यक्त केले.
बाळासाहेब खर्जुले, जालिंदर आरगडे, नागनाथ आगळे, प्रकाश वाकळे, मेजर गोपी उगले, संदीप पाखरे, अरविंद आरगडे, सचिन साबळे, गजानन सांगळे, विशाल शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!