Saturday, June 20, 2026

नागेबाबा पतसंस्थेला “बँको ब्लू रिबन” पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा  येथील श्रीसंत नागेबाबा पतसंस्थेला उत्कृष्ट व गुणवत्ता पूर्वक काम केल्याबद्दल अविज पब्लिकेशन यांच्यावतीने दिला जाणारा  ‘बँको ब्लू रिबन २०२४’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहिर झाला आहे.
    
संस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे  यांना दिलेल्या पुरस्कार पत्रात अविज पब्लिकेशनने म्हटले आहे की ,अथक प्रयत्नाने व गुणवत्तेबद्दलच्या कटिबध्दतेमुळे प्रतिष्ठेचा हा सन्मान आपल्या संस्थेस मिळाला आहे. मेहनतीने व परिश्रपुर्वक केलेल्या योगदानाची पावती आपणास बँको ब्ल्यु रिबन २०२४ च्या माध्यमातून प्राप्त झाली आहे.
         
नागेबाबा संस्था सातत्याने संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रगती करत आहे. राज्यभरातील संस्थांमधुन नागेबाबा पतसंस्थेची या मानाच्या व प्रतिष्ठेच्या पूरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराचे वितरण बँको सहकार परिषद ,अम्बी व्हॅली सिटी, लोणावळा येथे दि.३० जानेवारी रोजी होणार आहे.
    सहकार परिषदेत अत्याधुनिक बँकींग तंत्रज्ञान, यापुढील काळात येणारी आव्हाने याबद्दल सहकारी बँकींग क्षेत्रातील तज्ञ व दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन या पुरस्कार वितरण सोहळ्यात मिळणार आहे. 
- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!