नेवासा
फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांची फसवणूक, अन्याय, मनमानी यासह सरकारी लाभाच्या विविध योजनाची लाभार्त्यांची कामे व्हावीत, नेवासा तहसील मधील रेशन, सेतू विभागातील सावळा गोंधळ चौकशी करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुलभैया शेख यांचे नेतृत्वाखाली गुरुवार दि.१६ रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्याचा सर्वाधिक तक्रारीचा सुर फायनान्स कंपन्यविरोधात होता. कविता जोजारे, आशा अरगडे, कचरू पठाडे, असिफ पठाण, दिलीप राजळे,आदींनी काही फायनान्स कंपन्याची मनमानीभाषणातून मांडली.विशेष म्हणजे त्यात सर्वाधिक तक्रारदार संख्या महिलांची होती. काही फायनान्स कंपन्यांकडून वसुली, जप्ती करतांना कसा अन्याय, मनमानी,केली जात असते हे प्रांताधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सांगितले, तसेच संजय गांधी निराधार योजनेसह सरकारी लाभांच्या योजनाची प्रलंबित प्रकरणे, रेशन दुकानदारांच्या तक्रारी, दुकानरांच्याही अडचणी यावर अब्दुल शेख यांनी आंदोलनकर्त्यांसह चर्चा केली.
नेवासा तहसील मधील सेतू कार्यालय व त्यांचे काही एजंट अधिक रकमा घेवून जनतेची करत असलेलली हेळसांड, नवीन रेशन कार्ड काढतांना तीनशे रूपयाची अकराणी, त्या संबंधी कारवाईची मागणी निवेदनातून केली होती.
त्यावर आज जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी नेवासा तहसीलदार यांना त्वरित पत्र दिले असून कारवाई करण्यासाठी अहवाल मागितला आहे.
नगर विभागाचे प्रांतधिकारी सुधीर पाटील यांनी आंदोलनकर्त्यांनी चर्चा करून निवेदन स्वीकारले.
राष्ट्रवादी कामगार संघटनेचे मकरंद राजहंस, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अभिराज आरगडे, मनसेचे विलास देशमुख, सतीश कावरे, आदी यावेळी उपस्थित होते.
———-
फायनान्स कंपनीच्या अन्याया विरोधात तक्रारीवर प्रॉपर्टी ताबा मिळकत जप्ती लिलाव व प्रक्रियेस हरकती बाबत व ऐपतीप्रमाणे वन टाइम शटलंमेंट करून मिळणे बाबत संबंधीत फायनान्स बँक शाखाधिकाऱ्यास अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रही आंदोलनकर्त्यांना आज दिले.