नेवासा
भर दिवसात घरात घुसुन अल्पवयिन शाळकरी मुलीला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी इसमांनी घरातील रोख रक्कम लुटल्याची घटना नेवासा तालुक्यातील
सौंदाळा येथे बुधवारी १५ जानेवारी रोजी भर दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली.तसेच अन्य दोन घरांचे कुलूपे तोडून सुमारे ३ लाख ३९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे.
याबाबद स्वप्नाली बाबासाहेब आरगडे (वय१७ वर्षे) या अल्पवयिन शाळकरी मुलीने नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद कि, दि.१५ जानेवारी २०२५ रोजी मी सकाळी ७ वाजता शाळेमध्ये गेले होते व त्यांनतर ११ वाजेच्या सुमारास घरी आले. मी घरी आले त्यावेळी भाऊ बालाजी हा त्याचे शाळेत गेला होता तर काही वेळाने माझे आई वडील हे आमचे शेतात निघुन गेले. त्यानंतर मी एकटी घरी होते.
दि.१५ जानेवारी २०२५ रोजी दुरारी २:३० वाजेच्या सुमारास मी एकटीच घरामध्ये असतांना आमचे घरामध्ये अचानक तीन अनोळखी इसम वय अंदाजे २५ ते ३० वर्षे घरामध्ये आले. त्या तिन्ही इसमांच्या हातामध्ये चाकु होते. त्यातील एका इसमाने मला चाकू दाखवून मला गप्प बसण्यास सांगुन इतर दोन इसमांनी आमचे घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून कपाटातील रोख रक्कम घेवुन मला घरातील सोन्याबाबत विचारपुस करु लागले. आमचेकडे सोने नसल्याचे सांगितल्यावर ते तीन्ही इसम घराच्या बाहेर निघुन घराला बाहेरून कुलूप लावले. त्यांतनर मी माझा चुलत भाऊ अक्षय बापुसाहेब आरगडे यास फोन करून चोरीची माहिती दिली. त्याने मोठमोठ्याने आरडा ओरड केले नंतर त्यांचे समोरुन तीन इसम मोटार सायकलवरून पळुन गेले. भावाने आमचे घरी येवुन आमचे घराची बाहेरुन कडी उघडली व आई-वडीलाना फोन करुन माहीती दिली. सदर इसमांनी घरातील ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली.
त्यानतंर आरडा ओरड झालेने आमचे शेजारी राहणारे अशोक मुरलीधर आरगडे यांचे बंद घराचे कुलूप तोडुन त्याच इसमांनी चोरी करून त्यांच्या घरातील १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ४ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली आहे.
तसेच बाळासाहेब रामनाथ चामुटे यांचेही बंद घराचे कुलूप तोडुन १ लाख २० हजार रुपये किंमतीचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली असलेचे मला समजले आहे. त्यानंतर पोलीसांनी माहीती दिल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस व फिंगरप्रिन्टवाले भेट दिली आहे.
तरी दि.१५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास मी आमचे घरामध्ये एकटीच असतांना ३ अनोळखी इसमांनी घरामध्ये घुसून मला चाकुचा धाक दाखवुन आमचे कपाटामध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये रोख रक्कम तरोच आमचे शेजारी राहणारे अशोक ऑरगडे यांचे घरातील १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ४ हजार रुपये रोख रक्कम तसेच बाळासाहेब चामुटे यांचे घरातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ३ लाख ३९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे.
या फिर्यादिवरुन नेवासा पोलिस ठाण्यात अनोळखी तीन इसमांविरुद्ध भारीतय न्याय संहिता कलम ३०९(४) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे हे पुढील तपास करित आहेत.