Monday, March 30, 2026

युनूस पठाण यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील देडगाव येथील पत्रकार युनूस पठाण यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड निवड झाली आहे.

श्रीक्षेत्र देवगड येथे प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक डि.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाची बैठक झाली. पत्रकारांच्या अनेक समस्या व भविष्यातील अडीअडचणी यावर बैठकीत चर्चा करण्यात येवून नेवासा येथे लवकरच पत्रकार भवन बांधण्यात यावे यासाठीही पाठपुरावा करण्यात यावा या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीत देडगाव युनूस शरीफ पठाण
यांची नेवासा तालुका अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली.

प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या नेवासा तालुका कार्यकारणी अशी…
अध्यक्ष-युनूस पठाण, उपाध्यक्ष-आदेश जावळे व बाळासाहेब बोधक, कार्याध्यक्ष- सुरेश घुंगासे, प्रसिद्धी प्रमुख-दत्तात्रय शिंदे, सचिव- विकास बोर्डे, संघटक- सुमित पटारे व सचिन कुरुंद,सहसचिव- संदीप वारकड, सदस्य- प्रवीण खरात, गणेश झगडे, अशोक सांगळे, राजेंद्र कसबे, मयूर मांडलिक.
लवकरच विस्तारित कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असे नूतन अध्यक्ष श्री.पठाण यांनी सांगितले.

श्री. पठाण यांनी नेवासा तालुक्यात पत्रकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लिखाण करून गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी विद्यार्थी अशा अनेक विषयावर लिखाण करून सातत्याने न्याय देण्याचे काम केले आहे. या कार्याची दखल घेऊन संघटनेने तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केला आहे. वेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र लिंबोरे, शहाराम आगळे, रंजन जाधव, सुधीर जावळे यांच्यासह अधिपद अधिकारी यावेळी उपस्थित होते.या निवडीबद्दल तालुक्यातील विविध संघटना तसेच मान्यवराकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!